सायबर ठगांनी जळगावातील महिलेला लावला 5 लाख 29 हजाराचा चुना, अशी केली फसवणूक?

जानेवारी 19, 2025 11:17 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ऑनलाईन सायबर ठगांकडून लोकांना विविध माध्यमातून गंडविले जात असल्याचे बातम्या सातत्याने समोर येत आहे. फसवणुकीच्या घटनांबाबत जनजागृती करूनही लोक बळी पडत आहे. आता अशातच टास्कच्या नावाखाली जळगावात एका महिलेला लाखो रुपयात गंडविले. टास्क पूर्ण करून नफ्याचे आमिष दाखवत पहिल्या दोन टास्कवर नफा तर दिला, मात्र नंतर टास्क चुकीचा केल्याचे सांगत सोनल नितीन पाटील या ४० वर्षीय महिलेची पाच लाख २९ हजार ६१६ रुपयांमध्ये ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. हा प्रकार ६ ते १४ जानेवारी दरम्यान घडला. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून चार जणांविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

fraud jpg webp

मूळची पुणे येथील रहिवासी असलेल्या सोनल सध्या जळगावातील मनीषा कॉलनी परिसरात राहतात. चार जणांनी टेलिग्रामच्या एका ग्रुपमध्ये त्यांना सहभागी करून घेतले. महिलेला टास्कची माहिती देऊन त्यातून नफ्याचे आमिष दाखविण्यात आले. त्यांनी दोन टास्क पूर्ण केल्यानंतर त्यांना नफा दिला; मात्र नंतर टास्क चुकीचा केल्याचे महिलेला सांगण्यात आले.

नोकरीचा शोध पडला महागात
फसवणूक झालेल्या महिला दीड वर्षांपूर्वीच जळगावात रहायला आल्या. पूर्वी त्या एका फार्मा कंपनीत कामाला होत्या. आता त्या कामाच्या शोधत असल्याने त्यांनी त्यांचा बायोडाटा टेलीग्रामवर टाकलेला होता. सायबर गुन्हेगारांनी टेलीग्रामवरून महिलेशी संपर्क साधून घरबसल्या तुम्हाला टास्कचे काम दिले जाईल, असे सांगितले. त्यानुसार महिलेने होकार दिल्यानंतर टास्क देण्यात येऊ लागला व नंतर त्यांची फसवणुक करण्यात आली.

रिकव्हरी म्हणून उकळली रक्कम
पहिल्या दोन टास्कवर नफा मिळाल्याने महिलेचा विश्वास बसला. त्यामुळे त्या दिलेला टास्क करू लागल्या; मात्र नंतर टास्क चुकीचा केल्याचा समोरील व्यक्तींनी दावा करीत त्यांच्याकडून रिकव्हरी म्हणून वेगवेगळ्या कारणांनी रक्कम वसूल करीत गेले. घेतलेल्या रकमेवर कोणताही मोबदला न देता ६ ते १४ जानेवारी दरम्यान वेळोवेळी त्यांच्याकडून एकूण पाच लाख २९ हजार ६१६ रुपये घेतले. युपीआय, बँक खाते, आरटीजीएस अशा वेगवेगळ्या माध्यमातून ही रक्कम स्वीकारण्यात आली. एवढी रक्कम देऊन मोबदला मिळत नसल्याने व मुद्दलही मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात भाला भाटे

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now