जळगावात पावसाचा पुन्हा ब्रेक; आजपासून 16 ते 19 जुलैपर्यंत असं राहणार वातावरण?

जुलै 16, 2025 11:15 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जुलै २०२५ । राज्यातील काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी पावसाने ब्रेक घेतला आहे. जळगावातही ढगाळ वातावरण असले तरी पावसानं ओढ दिल्याचं दिसतेय. दरम्यान आज हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पुणे, रायगडसह रत्नागिरी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच पालघर, कोल्हापूर, सिंधुदुर्गाला पावसाचा यलो अलर्ट जरी करण्यात आला आहे. तर जळगावात आजपासून चार दिवस तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे.

tapman

हवामान खात्याने नाशिक, धुळे, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या काही भागात मुसळधार पावसाची नोंद केली आहे. शहरात आणखी पाऊस पडण्याची शक्यता असून बुधवारी ढगाळ आकाश आणि हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

पुढील काही दिवस कसा असेल पावसाचा जोर ?

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे, पुणे, रायगडसह रत्नागिरी आज ऑरेंज अलर्ट तर पालघर, कोल्हापूर, सिंधुदुर्गाला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात १६ जुलैपासून पावसाळी परिस्थिती राहण्याची शक्यता आहे, दररोज ढगाळ आकाश आणि हलका ते मध्यम पाऊस पडेल.

जळगावात तापमान वाढीचा अंदाज

दरम्यान जळगावात मागच्या दोन तीन दिवसात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. मात्र यांनतर आता पावसाने ब्रेक घेतला आहे. ढगाळ वातावरण असून पाऊस मात्र कोसळत नसल्याचं दिसतेय. दरम्यान आज १६ ते १९ जुलै पर्यंत जिल्ह्यात पावसाची शक्यता कमी असून यादरम्यान तापमानात वाढ होईल. कमाल तापमान ३४ ते ३७ अंशापर्यंत जाण्याचा अंदाज असून याकाळात उकाड्याचा सामना जळगावकरांना करावा लागू शकतो.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now