जळगावात गारठा वाढला ; एकाच दिवसात तापमान ३ अंशाने घसरले, आगामी दिवस असं राहणार तापमान?

डिसेंबर 9, 2025 10:32 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ डिसेंबर २०२५ । उत्तरेकडील शीत लहरींचे पुन्हा महाराष्ट्रात आगमन झाल्याने जळगावसह राज्यात गारठा वाढला आहे. ७ डिसेंबर रोजी जळगावचे रात्रीचे तापमान १२ अंश सेल्सिअस होते, मात्र दुसऱ्याच दिवशी, सोमवार ३ अंशांची मोठी घट झाल्यामुळे रात्रीचा पारा थेट ९.४ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला होता. यामुळे जळगावकरांना हुडहुडी थंडी जाणवत आहे.

tapman thandi

मागच्या काही दिवसापासून जळगावचे किमान तापमान १२ अंशाच्या वर कायम होता. तरी रात्री आणि सकाळच्या वेळेस कडाक्याची थंडी जाणवत होती. मात्र दुपारनंतर उन्हाचा उकाडा जाणवत होता. काल सोमवारी किमान तापमान ९.४ अंश सेल्सिअसपर्यंत इतके होता. तर कमाल तापमान २८ अंशापर्यंत होते. सध्या उत्तरेकडील शीत लहरींमुळे जळगावात कडाक्याची थंडी पडली आहे.

दरम्यान जळगाव जिल्ह्यात आगामी १५ दिवस रात्रीचे तापमान ८ ते १२ अंश सेल्सिअसदरम्यान कायम राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तविली आहे. डिसेंबर महिना पूर्णपणे कोरड्या हवामानाचा राहणार असल्याने, या महिन्याभरात जिल्ह्यात एक ते दोन वेळा थंडीची लाट येण्याचाही अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

कडाक्याच्या थंडीचा या पिकांना मोठा फायदा
या कडाक्याच्या थंडीचा रब्बी पिकांना, विशेषतः हरभरा आणि गहू या पिकांना मोठा फायदा होत आहे. गेल्या वर्षी ढगाळ वातावरणामुळे या पिकांचे नुकसान झाले होते. मात्र, यंदा कोरड्या आणि कडाक्याच्या थंडीमुळे हरभरा व गव्हाच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता असल्याने शेतकरी समाधानी आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories