जळगावकरांवर दुहेरी संकट! उष्णतेच्या तडाख्यात अवकाळी पावसाने झोडपले; पुढील ४८ तास धोक्याचे..

एप्रिल 20, 2026 12:46 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २० एप्रिल २०२६ । महाराष्ट्रातील हवामानाने सध्या अत्यंत विचित्र आणि धोकादायक वळण घेतले आहे. राज्याला एकाच वेळी ‘हीटवेव्ह’ (उष्णतेची लाट) आणि ‘थंडरस्टॉर्म’ (वादळी पाऊस) अशा दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. रविवारी विदर्भातील अकोला व वर्धा येथे तापमानाने ४५ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडून देशातील उच्चांकी नोंद केली असतानाच, जळगाव जिल्ह्यालाही अवकाळी पावसाने झोडपले आहे.

raindd

मध्यरात्री जळगावात विजांचा थरार
जळगाव शहरात रविवारी रात्री ११:३० च्या सुमारास अचानक विजांच्या कडकडाटासह पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. दिवसभर ४१.६ अंश तापमानात होरपळणाऱ्या जळगावकरांना या पावसामुळे रात्री थोडा दिलासा मिळाला असला, तरी वादळी वाऱ्यामुळे शहरातील अनेक भागांतील विद्युत पुरवठा खंडित झाला होता.

पुढील ३ दिवसांचा ‘यलो अलर्ट’
हवामान विभागाने २० ते २२ एप्रिल दरम्यान जळगावसह खान्देश आणि मराठवाड्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.
आज (२० एप्रिल): जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यांत मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.
२१ एप्रिल: मराठवाड्यातील लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यांत ३०-४० किमी वेगाने वारे वाहून गारपीट होण्याची शक्यता आहे.
२२ एप्रिल: विदर्भात पावसाचा जोर राहील आणि त्यानंतर हवामान हळूहळू निवळण्यास सुरुवात होईल.

शेतकरी बांधवांसाठी धोक्याची घंटा
एकीकडे उन्हाचा तडाखा वाढत असताना अचानक येणाऱ्या या पावसामुळे काढणीला आलेल्या उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे. विशेषतः जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी वादळी वाऱ्यापासून बागांचे संरक्षण करण्यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories