---Advertisement---
जळगाव शहर

जळगावकरांनो पाणी जपून वापरा! आज ‘या’ भागातील पाणीपुरवठा राहणार बंद..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ एप्रिल २०२३ । पाणीपुरवठ्याबाबत जळगाव शहरवासीयांसाठी एक महत्वाची बातमी आहे. ती म्हणजे आज मंगळवारी (ता. १८) शहरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. याबाबत महापालिका पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.

manapa nal jpg webp

काय आहे कारण?
शहरातील अयोध्यानगर (शांती निकेतन हौसिंग सोसायटी)मधील पाण्याची टाकी भरण्याची जलवाहिनी मुख्य वाहिनीला जोडण्याचे काम सुरू आहे. या कामास तब्बल २४ तास लागणार आहेत. त्यामुळे आज पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

---Advertisement---

महापालिकेने पत्रकात काय म्हटलं आहे?
याबाबत महापालिकेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की अयोध्यानगर, खेडी परिसरात मंगळवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. हा पाणीपुरवठा बुधवारी (ता. १९) करण्यात येईल. बुधवारी ज्या भागात पाणीपुरवठा आहे, त्या भागात गुरुवारी (ता. २०) पाणीपुरवठा करण्यात येईल.

नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शहरात बुधवारी (ता. १९) होणारा पाणीपुरवठा : योगेश्‍वरनगर, हिरा पाइप, शंकररानगर, खेडी परिसर, गृहकुल, म्हाडा कॉलनी, रायसोनी शाळा परिसर, अजिंठा हौसिंग सोसायटी, शांती निकेतन हौसिंग सोसायटी, रौनक कॉलनी परिसर, कौतिकनगर परिसर, अपना घर कॉलनी भाग १ व भाग २. गुरुवारी (ता. २०) होणारा पाणीपुरवठा : सदगुरूनगर, हनुमाननगर, लीला पार्क, गौरव हॉटेल परिसर.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---