⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

उष्णतेची लाट कायम ; जाणून घ्या कसे असेल आजचे जळगावातील तापमान

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मे २०२२ । गेल्या काही दिवसापासून जळगाव जिल्ह्यात उष्णतेची लाट असून उत्तरेकडून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे उष्णतेच्या झळांनी नागरिकांना हैराण केले आहे. जळगावात ४ मे राेजी कमाल तापमान ४२.२ अंश सेल्सिअस तर किमान २६.२ एवढे उच्चांकी नाेंदविण्यात आले आहे. गेल्या महिन्यातील तापमानापेक्षा मे महिन्याच्या सुरुवातील तापमान किंचित घटलेले दिसत असले तरी उष्णतेची लाट कायम आहे. खान्देशासह विदर्भात उष्णतेची लाट अधिक तीव्र हाेणार आहे.

जळगाव जिल्ह्यात ४ मेपासून तीन दिवस पुन्हा उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यासाठी हवामान खात्याने यलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे येत्या दाेन दिवसांमध्ये तापमान पुन्हा एकदा ४३ अंशापुढे जाईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. उष्ण वाऱ्यामुळे सूर्यास्तानंतर शहरात रात्री १० वाजेपर्यंत उष्णतेच्या झळा जाणवत आहे. पावसाचीही शक्यता आहे.

सध्या जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम असली तरी गेल्या महिन्यातील तापमानाच्या पारा पेक्षा मे महिन्यातील पहिल्याच आठवड्यात तापमानाचा पारा किंचित घसरलेले दिसतोय. एप्रिल महिन्याच्या अखेरीला पारा ४४ अंशावर गेला होता. तो या मे महिन्याच्या सुरुवातीलाच घसरून ४२ ते ४३ अंशावर आला आहे.

दरम्यान, यंदा मार्च महिन्यातच जळगावसह राज्यातील अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ४० अंशावर गेला होता. तर एप्रिल महिन्यात त्यात वाढ होऊन तो ४६ अंशावर गेला. यंदा मे महिन्यात राहणारी उन्हाची तीव्रता एप्रिल (April) महिन्यातच दिसून आली. त्यामुळे मे महिना कसा जाईल याची चिंता आता जळगावकरांना लागली आहे.

जळगावातील आजचे दिवसभरातील तापमान (Jalgaon Temperature) असे?

वेळ – अंश
१२ वाजेला – ३९ अंश
१ वाजेला- ४० अंशापुढे
२ वाजेला – ४१ अंश
३ वाजेला – ४२ अंशापुढे
४ वाजेला – ४२ अंश
५ वाजेला – ४१ अंश
६ वाजेला – ४१ अंश
७ वाजेला – ३९ अंश
आणि रात्री ८ वाजेला ३६ अंशावर स्थिरावणार.