Jalgaon Temperature : यंदाचा उन्हाळा अधिक तापदायक ठरणार ; जळगाव जिल्ह्यात आगामी दिवस असं राहणार तापमान..

फेब्रुवारी 24, 2025 10:51 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ फेब्रुवारी २०२५ । जळगाव शहरासह जिल्ह्यात कमाल तापमानाचा पारा ३५ अंशावर गेला असून यामुळे उन्हाच्या चटक्यासह उकाड्यात वाढ झाली आहे. सध्या थंड वाऱ्यांमुळे रात्री आणि पहाटच्या वेळेस गारठा जाणवत आहे. मात्र दुपारी कडक उन्हाचा चटका बसत आहे. दरम्यान आगामी पाच दिवसात जळगावचा पारा दोन ते तीन अंशाने वाढून ३७ वर पोहोचू शकते. तर मार्चच्या दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी कमाल तापमान चाळिशीपार जाण्याची शक्यता आहे असा हवामान तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्यामुळे जळगावकरांना एप्रिल, मे महिन्याच्या उन्हाचा अनुभव मार्च महिन्यातच येईल. Jalgaon Temperature Update News

Tp 1

यंदाचा उन्हाळा गेल्यावर्षीच्या तुलनेत अधिक तापदायक राहील. यंदा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच उन्हाची तीव्रता वाढताना दिसत आहे शहराच्या कमाल तापमानात सातत्याने चढ-उतार सुरूच असून काल रविवारी जळगावचा कमाल तापमानाचा पारा ३५ अंशावर तर किमान तापमान १४ अंश इतके होते. आता जिल्ह्यासह शहरातील हवामान पुढील पाच दिवस कोरडे राहणार असून या काळात कमाल तापमान ३७ तर किमान तापमान १५ ते १७ अंशांदरम्यान राहणार आहे. परंतु यानंतर अरबी समुद्राकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यातील काही भागांत ढगाळ वातावरण असेल. शिवाय, काही भागात अवकाळी पावसाची शक्यता आहे. तापमान दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी ४० अंशांपुढे जाऊ शकते.

असा राहणार मार्च महिना
मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात हवामान कोरडे असेल. तापमान ३९ ते ४० अंशांवर राहील. शेवटच्या आठवड्यातच कमाल तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे एप्रिल, मे महिन्याच्या उन्हाचा अनुभव जळगावकरांना मार्च महिन्यातच येईल. दुपारी उन्हाच्या चटक्यांचा सामना जळगावकरांना करावा लागेल.

यंदा गेल्यावर्षापेक्षा उन्हाचा तडाखा जास्त राहणार असल्याचा अंदाज आहे. अरबी समुद्राकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे जिल्ह्यात मार्चचा पहिला आठवडा ढगाळ असेल. मे महिन्यात तापमान ४६ ते ४७ दरम्यान राहण्याचा अंदाज.

जळगावात आगामी सहा दिवस असं राहणार तापमान
२४ फेब्रुवारी : किमान -१६ …. कमाल -३५
२५ फेब्रुवारी : किमान -१७ …. कमाल -३६
२६ फेब्रुवारी : किमान -१६… कमाल ३६
२७ फेब्रुवारी : किमान १५… कमाल ३७
२८ फेब्रुवारी : किमान १५… कमाल ३७
१ मार्च : किमान १७… कमाल ३७

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment