⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर जमले पूर्व मोसमी पावसाचे ढग, आज तापमान वाढतेच

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मे २०२२ । यंदा मान्सून १० दिवस आधीच अंदमानात दाखल झाला असून मान्सूनचा प्रभाव राज्यावर जाणवत आहे. या आठवड्यात काेकण, गाेवा, मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रात देखील पूर्वमाेसमी पावसाचे ढग जमले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात बुधवारी उन्ह-सावलीचा खेळ सुरु असल्याने तापमानाचा पारा एक ते दीड अंशाने घसरला. बुधवारी जिल्ह्यात ४२.४ अंश तापमान होते. मात्र आज गुरुवारी तापमानाचा पारा पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

बुधवारी दुपारी आकाश ७० टक्के ढगाळ हाेते. दुपारी २ वाजेपर्यंत तापमान ४० अंशांपर्यंत तर त्यानंतर पारा ४२.४ अंशांवर गेला हाेता. दुपारनंतर तापमान वाढल्याने सायंकाळी उष्णतेच्या झळांनी नागरिकांना चांगलेच हैराण केले हाेते. दुपारी १२ वाजेपर्यंत तापमान अवघे ४० अंशांखाली हाेते. दरम्यान, हवामान विभागाकडून येत्या तीन दिवसांमध्ये जिल्ह्यात पूर्वमाेसमी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

मागील काही दिवसांपासून जळगावकरांना उष्णता व उकाड्याला सामोरे जावे लागते. गेल्या आठवड्यात तापमानाचा पारा २ ते ३ अंशाने घसरून ४१ ते ४२ अंशावर पोहोचला होता. त्यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र काही दिवसापूर्वी तापमानाचा पारा वाढू ४४ अंशापर्यंत गेल्याने उन्हाचा उकाडा पुन्हा जाणवू लागला आहे. दरम्यान, हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला असून लवकरच उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

जळगावातील आजचे दिवसभरातील तापमान (Jalgaon Temperature) असे?

वेळ – अंश
१२ वाजेला – ४१ अंश
१ वाजेला- ४२ अंशापुढे
२ वाजेला –४३ अंश
३ वाजेला – ४३अंशापुढे
४ वाजेला – ४२ अंश
५ वाजेला – ४२ अंश
६ वाजेला – ४१ अंश
७ वाजेला – ३८ अंश
आणि रात्री ८ वाजेला ३७ तर रात्री ९ वाजेला ३६ अंशावर स्थिरावणार.