⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

Jalgaon Temperature Update : जाणून घ्या, आजचे तापमान ‘मिनीट टू मिनीट’

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ एप्रिल २०२२ । एकीकडे राज्यातील काही भागात अवकाळी पावसाचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे मागील काही दिवसापासून ढगाळ वातावरणामुळे तापमानाचा पारा काही अंश घसरला होता. मात्र काल रविवारी पुन्हा पारा वाढलेला दिसून आला. जळगाव जिल्ह्यात काल तापमान (Jalgaon Temperature) वाढून पुन्हा ४२.४ अंशावर पोहोचले हाेते. यापूर्वी पारा ४१ अशांवर होता. दरम्यान, आज साेमवारी तापमानात आणखी वाढ हाेण्याची दाट शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्यात मागील काही दिवसात तापमानाचा पारा एक ते दोन अंशाने कमी जाणवून आला. शनिवार जळगावचा पारा ४१.७ अंशांपर्यंत खाली आला होता. तर रविवारी वाढून तो ४२.४ अंशावर पोहोचला होता. आज सकाळी ११ वाजेला तापमानाचा पारा ३८ अंशावर होता. तर तो दुपारच्या वेळेस ४२ ते ४३ अंशापुढे जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आज म्हणजेच 18 एप्रिलपासून कोकणासह (Kokan) मध्य महाराष्ट्रात (Central Maharashtra) पावसाचा इशारा (IMD Alert) देण्यात आला आहे. पण दुसरीकडे विदर्भात (Vidharbh) उन्हाचे चटके कायम राहणार आहेत. विदर्भात उन्हाचा पारा 44 अंशावर पोहचला आहे. त्यामुळे उन्हाचे चटके आणखी लागणार आहेत.

जळगावातील आजचे दिवसभरातील तापमान (Jalgaon Temperature) असे?

वेळ – अंश
१२ वाजेला – ३९ अंश
१ वाजेला – ४१ अंश
२ वाजेला- ४२ अंश
३ वाजेला – ४२ अंशापुढे
४ वाजेला – ४२ अंशापुढे
५ वाजेला – ४१ अंश
६ वाजेला – ३८ अंश
७ वाजेला – ३६ अंश
आणि रात्री ८ वाजेला ३४ अंशावर स्थिरावणार.