जळगाव जिल्हासामाजिक

जळगाव जिल्ह्यातील तरुणीने पहिल्याच प्रयत्नात मिळविले एमपीएससी परीक्षेत यश

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यातील पाथरी गावाच्या तरुणीने महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीकडून घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परिक्षेत (एमईएस – MES) पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले आहे. श्रृती नेटके असं या तरुणीने नाव आहे. तिला आई-वडिलांनी मोठ्या प्रमाणात भावनिक साथ दिली.

श्रृतीचे वडील रसळपुर येथे महावितरणमध्ये ऑपरेटर आहे. त्यामुळे नोकरीनिमित्ताने ते रावेत येथे राहतात. तिची आई आश्रमशाळेत शिक्षिका आहे. तिचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण हे रावेर येथे झाले. दरम्यान, नाशिक येथील के. के. वाघ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग एज्युकेशन अँड रिसर्च येथे तिने सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे. या शैक्षणिक प्रवासात तिने स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली.महाराष्ट्र अभियांत्रिका सेवा (एमईएस) ही एमपीएससीद्वारे वर्ग- दोन पदासाठी घेतली जाणारी परिक्षा आहे. त्यासाठी तिने अहोरात्र मेहनत घेतली.श्रृतीने पुर्व परिक्षेत 100 पेक्षा अधिक गुण मिळवत मुख्य परिक्षेत 258 गुण तर मुलाखतीत 26 गुण मिळाले.‌तिन्ही टप्यावर उत्तम गुण असल्याने तिला यशाची दारे सहज खुली झाली. हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. तिने अभ्यासक्रम समजून घेतला

नवीन काही गोष्टी करण्यापेक्षा एकाच गोष्टीचा पुन्हा पुन्हा सराव केला पाहिजे. तसेच यामध्ये सातत्य मात्र ठेवले. त्यामुळेच,तीन वर्षात कठोर मेहनत करून एमपीएससीमार्फत घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परिक्षेत (एमईएस – MES) पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले आहे. यानंतर सार्वजनिक बांधकाम तसेच जलसंपदा विभागात अभियंता म्हणून काम बघणार आहे.‌ तसेच, श्रृतीने अनुसूचित जाती (SC) या प्रवर्गातून महिला गटात राज्यात पहिली येण्याचा मान मिळवला आहे.

godavari advt (1)

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button