जळगावची शिवसेना म्हणजे ‘जगा सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण’
जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑगस्ट २०२१ । ‘जगा सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण’. हे आपण कित्येक जणांकडून ऐकले आहे. मात्र याचे तंतोतंत उदाहरण म्हणजे जळगाव शिवसेना. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कानाखाली मारली पाहिजे होती, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले.
त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या गरिमेला ठेच लागली म्हणून नारायण राणे यांच्यावर जळगाव शिवसेनेने शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आणि त्याच बरोबर राणे यांचा शिवसैनिकांनी कोंबडी चोर, भडवा म्हणून संबोधलं.
जर केंद्रीय मंत्र्याने मुख्यमंत्र्याच्या कानाखाली मारली असती असे विधान केले तर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येतो. तर केंद्रीय मंत्र्याला शिव्या देणे हे शिवसेनेच्या संस्कारात बसते का? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर कोणती कारवाई होणार? नारायण राणे हे मंत्री आहेत त्यांनी स्वतःच्या मर्यादित राहायला पाहिजे. असे शिवसेनेतर्फे म्हणण्यात येत आहे.
मात्र जेव्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील नारायण राणे यांच्या अंगात चुडेल घुसली आहे असे अंधश्रद्धा पसरवणारे विधान करतात तेव्हा ते स्वतः मंत्री आहेत ते विसरले होते का? पालकमंत्र्यांनी केलेल्या या विधानावर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल होणार का? असा प्रश्न देखील नागरिक उपस्थित करत आहेत.