शिवसेना रिक्षा चालक बांधवांसाठी तत्पर
जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मे २०२१ । महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील 7 लक्ष 15 हजार परमीट धारक रिक्षा चालक बांधवांना कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अर्थसहाय्य म्हणून रू. 1500 घोषीत करण्यात आले होते. सदर 1500 रूपये परमिट धारक रिक्षा चालकांच्या बँक खात्यात येणार असून यासाठी त्यांना ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे. यासाठी आधारकार्ड, बँक खाते क्रमांक, लायसन्स/बॅच, रिक्षा परवाना इत्यादी कागदपत्र लागणार आहेत.
शिवसेना जळगाव महानगर तर्फे शहरातील पांडे चौक, जळगाव येथे रिक्षा चालक बांधवांसाठी मदतकक्ष सुरू करण्यात आले आहे. 25 मे ते 5 जून 2021 पर्यंत जळगाव शहरातील परमिट धारक रिक्षा चालक बांधवांना ऑनलाईन अर्ज याठिकाणी भरून देण्यात येणार आहेत. मदत कक्षाचे उद्घाटन महपौर जयश्री महाजन, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही, शिवसेना महानर प्रमुख शरद तायडे यांच्या हस्ते होणार आहे.
तरी जास्तीत जास्त रिक्षाचालक बांधवांनी या शासकीय योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवसैनिक व युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक विराज कावडीया यांनी केले आहे.