जळगाव लाईव्ह न्यूज । १६ एप्रिल २०२१ । व्हाॅट्सअॅपवर चीतावणी देणारे स्टेटस ठेवल्यामुळे शहरातील शनिपेठ परिसरातील चौगुले प्लॉट भागात ११ एप्रिल रोजी दोन गटात वाद झाला होता. यावेळी एका गटाकडून थेट दोन पिस्तूल, चॉपर, तलवारीचा वापर करून सहा राऊंड फायर करण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ३ जणांना शिताफीने अटक केली आहे. विजय जयवंत शिंदे (वय २३), किशोर जयवंत शिंदे (वय २०) व राहुल अशोक शिंदे (वय २२, तिघे रा. चौगुले प्लॉट) असे अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
गाेळीबारच्या घटनेमुळे शनिपेठ परिसरात प्रचंड दहशत पसरली आहे. घटनेनंतर परस्परविरोधी गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलिसांनी पहिल्याच दिवशी एका गटातील पाच संशयितांना अटक केली होती. दुसऱ्या गटातील गोळीबार करणारा विजय शिंदे हा घटनास्थळावरून बेपत्ता झाला होता. त्याच्यासह तिघांना अटक करण्यात आली असून या तिघांकडून गुन्ह्यात वापरलेले दोन पिस्तूल पोलिसांनी हस्तगत केले आहेत. पुढील चौकशीसाठी त्याला शनिपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
यांनी केली कारवाई
स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक स्वप्निल नाईक, उपनिरीक्षक अमोल कवडे, विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, सुधाकर अंभोरे, अशरफ शेख, नितीन बाविस्कर, प्रितम पाटील, राहुल पाटील, रमेश जाधव, सलीम पिंजारी, रवींद्र पाटील, परीश जाधव, अमोल विसपुते, िगरीश पाटील, अमित बाविस्कर, राहुल पाटील, राहुल घेटे, अनिल कांबळे, मुकुंद गंगावणे यांच्या पथकाने तिघांना अटक केली.