सावरकरांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या रिक्षा रॅलीने वेधले जळगावकरांचे लक्ष
जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मे २०२२ । वीर सावरकर यांच्या जयंतीदिनानिमित्त जळगाव शहरातून वीर सावरकर रिक्षा युनियनने काढलेल्या रिक्षा रॅलीत शहरातील रिक्षा चालक – वाहक सहभागी झाले. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने निघालेल्या या रॅलीने जळगाव करांचे लक्ष वेधून घेतले. रिक्षा रॅली चे नेतृत्व वीर सावरकर रिक्षा युनियन चे अध्यक्ष दिलीप सपकाळे यांनी केले.
रिक्षा रॅली च्या सुरवातीला स्वातंत्रवीर सावरकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्रसिद्ध विधीतज्ञ सुशील अत्रे होते. यावेळी महापौर जयश्री महाजन, मनपा आयुक्त विद्या गायकवाड, विधीतज्ञ विजय काबरा, जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे, सहा.आरटीओ भूषण मोरे, डॉ.अर्जुन भंगाळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी रिक्षा युनियनचे अध्यक्ष दिलीप सपकाळे यांनी रिक्षा चालकांना येणाऱ्या अडचणी कथन केल्या. विधीतज्ञऊ शुभंकर अत्रे, जिल्हा पेठचे पो.ऊ. नि. तूषार जावरे, शहर पोलिस ठाण्याचे भरत पाटील, रमेश सोनवणे आदी यावेळी उपस्थित होते.
वीर सावरकर रिक्षा युनियन कार्यालयापासून नेहरू चौक मार्गे टॉवर चौक, चित्रा चौक कडून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे स्वातंत्र्य चौकातील वीर सावरकर पुतळ्या जवळ रिक्षा रॅलीची सांगता करण्यात आली.
सूत्र संचालन महेश शिंपी व आभार वाल्मिक सपकाळे यांनी मानले. यशस्वीतेसाठी कैलास विसपुते, भानुदास गायकवाड, पोपट ढोबळे, विलास ठाकूर, शशिकांत जाधव, किसन पाटील, गोपाल पाटील, उदय वाणी, सुकदेव नाथबाबा, उत्तम पाटील, किरण मराठे, अनिल शिंगटे, विलास पाटील, सुभाष चौधरी, संभा पाटील, एकनाथ बारी, ललित कानडे, भरत राणे, कैलास पाटील, चंदू लाडवंजारी, योगेश सांगळे, किरण पाटील, साहिल शेख, गोपाल शर्मा, भास्कर शिरसाळे, रतनलाल शर्मा, शंकर वाणी, दिलीप चौधरी, मनोहर भोगे, शकील शेख, रत्नाकर वाणी, गजानन देशमुख, साहिल शेख, प्रेम पाटील, रेंद्र चौधरी, ज्ञानेश्वर बाबुराव, किरण जाधव, सुनिल पवार, ज्ञानेश्वर तायडे, संजय चौधरी, सौरभ नाचोणे, नितीन माळी, जुनेद पिंजारी, जयराम पाटोळे, दिनेश पाटील, विलास तिडके, विशाल सोनवणे, संजय घुगे, विनोद पाटील, दीपक मराठे, नाना कोळी, विलास पाटील, बंडू वाणी, उमेश भोस, रामदास भोस, राम शिंदे, रईस खान, महेंद्र पाटील, अजय चौधरी, नरेंद्र चौधरी, मुकेश पाल, विजय बोरणारे, गोपाळ गवई आदींनी परिश्रम घेतले.