जळगाव शहरनोकरी संधी

पोलीस अधीक्षक कार्यालय जळगाव येथे ‘या’ पदांसाठी भरती, पगार 28000 पर्यंत मिळेल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांचे अधिनिस्त असलेल्या जळगांव कार्यालयात भरती निघाली आहे. विधी अधिकारी गट ब व विधी अधिकारी या पदांसाठी ही भरती होणार असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालीय. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 डिसेंबर 2022 आहे.

एकूण जागा : ०९

रिक्त पदांचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

विधी अधिकारी गट ब
शैक्षणिक पात्रता :
उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असेल. तो सनदधारक असेल. वकिली व्यवसायाचा किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक राहील.
उमेदवार गुन्हेगारी विषयक, सेवाविषयक, प्रशासनीक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थितीत तथा विभागीय चौकशी इ. बाबतीत ज्ञानसंपन्न असेल ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेन पार पाडू शकेल.उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असेल.

विधी अधिकारी

वयोमर्यादा – ६० वर्षे

इतका पगार मिळेल?

विधी अधिकारी गट ब या पदाकरिता एकत्रीत अनुज्ञेय मासिक देय रक्कम रू.२५,०००/- + दुरध्वनी व प्रवास खर्चाकरिता रू.३,०००/- असे एकुण रू.२८०००/- दरमहा देय राहील या व्यतिरीक्त इतर कोणतेही भत्ते अनुज्ञेय होणार नाहीत
तर विधी अधिकारी या पदाकरिता एकत्रीत अनुज्ञेय मासिक देय रक्कम रू. २००००/- + दुरध्वनी व प्रवास खर्चाकरिता रू.३०००/- असे एकुण रू.२३,०००/- दरमहा देय राहील या व्यतिरीक्त इतर कोणतेही भत्ते अनुज्ञेय होणार नाहीत.

अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – पोलीस अधीक्षक, अहमदनगर, एस. पी. चौक, नगर-औरंगाबाद रोड, अहमदनगर – 414001
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 डिसेंबर 2022

अधिकृत संकेतस्थळ :  jalgaonpolice.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button