जळगाव पोलीस दलात भाकरी फिरल्या; 19 निरीक्षकांच्या बदल्या, पाहा कोणाची कुठे बदली

जून 28, 2025 11:03 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जून २०२५ । जळगाव जिल्हा पोलीस दलात भाकरी फिरल्या आहे. पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी जिल्ह्यातील 19 पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढले आहे. प्रशासकीय बदल्या झालेल्या अधिकार्‍यांमध्ये सहा सहाय्यक पोलिस निरीक्षक तर 13 पोलिस उपनिरीक्षकांचा समावेश आहे तर चार अधिकार्‍यांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या आहेत.

maharashtara police jpg webp

बदली झालेले अधिकारी, कंसात बदलून आल्याचे ठिकाण व कंसाबाहेर बदलीचे ठिकाण
सहाय्यक निरीक्षक अजयकुमार वाढवे (यवतमाळ) यावल
सहाय्यक निरीक्षक संजय निकुंभ (पुणे शहर) पाचोरा
सहा.निरीक्षक नितीन पाटील (नाशिक एसीबी) बाजारपेठ, भुसावळ
सहा.निरीक्षक गणेश फड (नियंत्रण कक्ष) जळगाव आर्थिक गुन्हे शाखा
सहा.निरीक्षक योगीता नारखेडे (मानव संसाधन विकास) एएचटीयू
पोलिस उपनिरीक्षक अशोक खेडकर (गोंदिया) जळगाव शहर
पोलिस उपनिरीक्षक अविनाश राठोड (रायगड) रावेर
पोलिस उपनिरीक्षक शांताराम देशमुख (जिल्हापेठ) पाचोरा
पोलिस उपनिरीक्षक सुनील मोरे (यावल) रावेर
पोलिस उपनिरीक्षक कुणाल चव्हाण (चाळीसगाव ग्रामीण) एक वर्ष मुदतवाढ
पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे (पाचोरा) एक वर्ष मुदतवाढ
पोलिस उपनिरीक्षक सुनील चौधरी (वाचक अपोअ, जळगाव) एक वर्ष मुदतवाढ
पोलिस उपनिरीक्षक मकसूद बशीर शेख (तक्रार अर्ज शाखा) एक वर्ष मुदतवाढ
पोलिस उपनिरीक्षक प्रिया दातीर (शनीपेठ) एक वर्ष मुदतवाढ
पोलिस उपनिरीक्षक समाधान गायकवाड (वाचक उपअधीक्षक, जळगाव) अमळनेर

चार अधिकार्‍यांच्या विनंती बदल्या
पोलिस उपनिरीक्षक नंदकिशोर काळे (भुसावळ तालुका) मुक्ताईनगर
सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र चाटे (मुक्ताईनगर) भुसावळ तालुका
पोलिस उपनिरीक्षक मंगळू बेंडकोळी (बाजारपेठ) वरणगाव
पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे (चोपडा शहर) जळगाव गुन्हे शाखा

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now