⁠ 
शुक्रवार, जानेवारी 10, 2025
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | धक्कादायक : ११ गुन्हे असलेला गुन्हेगार जाळ्यात, अल्पवयीन मुलगी गर्भवती

धक्कादायक : ११ गुन्हे असलेला गुन्हेगार जाळ्यात, अल्पवयीन मुलगी गर्भवती

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ०४ मे २०२१ । जळगाव शहरापासून जवळच असलेल्या एका गावातील अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढत एका गुन्हेगाराने पळवून नेले होते. एमआयडीसी पोलिसात दाखल गुन्ह्यात पोलिसांनी या गुन्हेगाराला मध्यप्रदेशातून अटक केली असून पीडित ९ आठवड्यांची गर्भवती असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान, पोलिसांनी अटक केलेल्या या गुन्हेगारावर घरफोडीचे तब्बल ११ गुन्हे दाखल आहेत.

दरम्यान, गर्भवती पीडितेला बाल निरीक्षणगृहात पाठवण्यात आलेले आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गावातून १६ मार्च रोजी दुपारी तीन वाजता अल्पवयीन मुलगी गायब झाल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर तिच्या पालकांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार कल्‍पनाबाई सुधाकर गवारे (रा. आयोध्या नगर जळगाव) या महिलेविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

देवदर्शनाला जातो असे सांगून कल्‍पनाबाई हिने पीडितेला पळवून नेले होते, असे तक्रारदारांचे म्हणणे होते पोलिसांनी केलेल्या चौकशीत मोहनसिंग याने पीडितेला प्रेमाच्या जाळ्यात सोडून लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर तिला पळवून नेले.दोघांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता ती नऊ आठवड्याची गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले, त्यानुसार मोहनसिंग याच्याविरुद्ध बलात्काराचे वाढीव कलम लावण्यात आले. दरम्यान, या प्रकरणात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ॲट्रॉसिटीचे कलम लावण्यात आलेले आहे. सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा व पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे या गुन्ह्याचा तपास करीत आहे.

अटकेतील मोहनसिंग याला उपनिरीक्षक विशाल सोनवणे यांनी मंगळवारी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस.जी ठुबे यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सात मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सरकारतर्फे एडवोकेट पंढरीनाथ चौधरी यांनी बाजू मांडली. या गुन्ह्यातील अन्य आरोपी फरार असल्याने त्यांना अटक करण्याचे कारण सांगून पोलीस कोठडीची मागणी केली.

मोहनसिंग बावरी हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे त्याच्याविरुद्ध घरफोडी, चोरी,  मारामारी, प्राणघातक हल्ला व खुनाचा प्रयत्न आदी प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. जिल्हा पेठ व रामानंदनगर पोलीस ठाण्यात प्रत्येकी तीन तर एमआयडीसी पोलिस ठाण्यात पाच गुन्हे दाखल आहेत. आता अपहरण व बलात्काराचा हा सहावा गुन्हा या पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. आतापर्यंत त्याच्याविरुद्ध ११ गुन्हे दाखल झालेले आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.