…अन्यथा पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा
जळगाव लाईव्ह न्यूज । २८ एप्रिल २०२१ । जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. जळगाव जिल्ह्यात खासगी कोविड रुग्णालय 115 आहेत. त्या रुग्णालयमध्ये आजची स्थिती अशी आहे कि O2 वर असलेले रुग्ण हे हे साधारण 1000 आहेत ICU मध्ये 600 च्या आसपास आहे व व्हेंटिलेटर वर 140 च्या आसपास आहे म्हणजे एकूण 1740 रुग्णांना दररोज रेमिडी इंजेकशन ची गरज असते त्यातील O2चे पेशन्ट सोडले तरी कमीतकमी 1000 इंजेकशनची जिल्ह्यात गरज आहे.
असे असतानाही जिल्ह्यात गेले काही दिवसापासून 300 ते 400 इंजेकशन च्या वर पुरवठा होत नाही आहे. प्रशासनाने फक्त 300 इंजेकशन वाटप केले आहे. यात icu चे रुग्ण सुद्धा कव्हर होत नाही. तीन दिवसापूर्वी खासदार उन्मेष दादा यांच्या प्रयत्न मधून जिल्ह्यात 1000 इंजेकशन प्राप्त झाले. तो दिवस सोडला तर गेले 20 दिवसात एक ही दिवस इंजेकशन पुरेसे उपलब्ध का होत नाही असा सवाल विधानसभा क्षेत्र प्रमुख जळगाव दीपक साखरे यांनी केला आहे.
पालकमंत्री व या जिल्ह्यात शिवसेनेचे आमदार, राष्ट्रवादीचे आमदार हे या जिल्ह्यातील जनतेसाठी सरकारशी भांडून इंजेकशन का उपलब्ध करुन देत नाही? याचे उत्तर द्या❓️भाजपाला शिव्याशाप देणारे जिल्ह्याचे पालकमंत्री जनतेसाठी शिंगाडे मोर्चा काढणारे आज का गप्प आहे? पालकमंत्री आपली जवाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरले आहे. इंजेक्शनचा साठा पुरेसा न उपलब्ध झाल्याने जळगाव जिल्ह्यात डेथ रेशो वाढला इंजेकशन अभावी अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहे.
याच परिस्थिती चा फायदा उचलून इंजेकशनचा काळा बाजार सुरु झाला आहे 1200चे इंजेकशन 22000रु विकणारे कालच पोलिसांनी पकडले विकणारे पकडले पण पुढील तपास मात्र थंड आहे कारण इंजेकशन च्या बॅच नंबर वरून ते इंजेकशन कोणत्या मेडिकल वरून आले ते कळेल फक्त विकणारे पकडून उपयोग नाही तर अशा मेडिकल वर पण धाडी टाकल्या पाहिजे पण पुढील तपास थंड बसत्यात गेला याचे उत्तर पालकमंत्री म्हणुन आपण द्यावे राष्ट्रवादी चे मंत्री असलेल्या जिल्ह्यात पुरेसा साठा जातो परंतु जळगाव जिल्ह्यावर अन्याय का? असाही सवाल साखरे यांनी केला असून पालकमंत्री म्हणुन आपण जिल्ह्यात इंजेकशन उपलब्ध करुन द्या अन्यथा इंजेकशन अभावी होणाऱ्या मृत्यूची जवाबदरी स्वीकारा, असेही ते म्हणाले.