---Advertisement---
जळगाव शहर

कोरोनामुळे मृत्यू झालेले नागरिकांना मनपातर्फे मोफत लाकूड उपलब्ध करून द्यावे

jalgaon news
---Advertisement---

जळगाव शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहे. न बऱ्याच लोकांची आर्थिक परिस्थिती हलाकीची असून बरेच जन कोविड मुळे मृत्युमुखी पडत आहे. तरी म.न.पा. मार्फत स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी लाकडे मोफत देण्यात यावे.

jalgaon news

तसेच जळगाव शहर म.न.पा. अंतर्गत सी.सी.सी सेंटर येथे डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली कोविड-१९ रुग्ण उपचार घेत असून सध्या जळगाव शहरात पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या खूप जास्त प्रमाणात वाढत आहे. अश्या परिस्थितीत जळगाव शहरात सर्व खाजगी रुग्णालये फुल असून शहरातील नागरिकांचे ऑक्सिजन बेड साठी अतोनात हाल होत आहे. तरी अश्या गंभीर अवस्थेत सुद्धा जळगाव शहर म.न.पा. च्या सी.सी.सी. सेंटर ला डॉक्टरांच्या देखरेखी खाली असून सुद्धा तेथे ऑक्सिजन बेडची व्यवस्था होत नाही.

---Advertisement---

तरी आपण सी.सी.सी. सेंटर ला किमान ५० ऑक्सिजन बेडची व्यवस्था करावी. असे निवेदनं महानगर पालिका आयुक्त यांना भाजपा जळगाव जिल्हा महानगर अध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांनी नुकतेच दिले. या प्रसंगी आ सुरेश भोळे (राजु मामा) म न पा जळगाव स्थाइ सभापती राजेंद्र घुगे पाटील, गटनेते भगत भाई बालाणी, जिल्हा पदाधिकारी विशाल त्रिपाठी, महेश जोशीं उपस्थित होते

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---