जळगाव महापालिका निवडणूक : शहरात 53.59 टक्के मतदान

जानेवारी 15, 2026 11:05 PM

जळगाव लाईव्ह न्यूज १५ जानेवारी २०२६ । जळगाव शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी मध्यम प्रतिसाद नोंदवला. एकूण 53.59 टक्के मतदान झाले असून शहरात 2,34,996 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. आता उद्या या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाहीर आहे.

loksabha election jpg webp

जळगाव महापालिकेच्या ७५ जागांपैकी १२ जागा बिनविरोध निवडून आले असून उर्वरित ६३ जागांसाठी आज सकाळी ७.३० वाजेपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली होती. यांनतर सकाळी ९.३० वाजेपर्यंत फक्त ५.५ टक्के मतदानाची नोंद झाली होती. सुरुवातीच्या दोन तासांत जळगावकरांनी उत्साह दाखवला नव्हता. दुपारी १:३० पर्यंत २२.४९ टक्के मतदान झाले होते. मात्र मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात मतदाराचा उत्साह दिसून आला होता.

Advertisements

सायंकाळी शहरातील मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत मोठ्या संख्येने मतदान केंद्रांकडे गर्दी केली. सायंकाळी ५.३० वाजेनंतर अनेक ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडली. रात्री उशिरापर्यंत प्राप्त आकडेवारीनुसार शहरात एकूण ५५.५९ टक्के मतदान झाले आहे.

Advertisements

दिवसभराच्या मतदानात पुरुष मतदार १,२२,८५८, स्त्री मतदार १,१२,१३३ तर इतर प्रवर्गातील ५ मतदारांनी आपला हक्क बजावला. यामध्ये एकूण २,३४, ९९६मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. प्रशासनाकडून मतदानासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवण्यात आल्या होत्या. सुरक्षा व्यवस्थाही चोख ठेवण्यात आल्याने कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. आता मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले असून, जळगाव शहराचा कारभार पुढील पाच वर्षे कोणाच्या हाती जाणार याचा फैसला लवकरच होणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now