न्यायालय उभारणीसाठी शाहू नगरातील जागा अतिक्रमणमुक्त; जळगाव महापालिकेची कारवाई

फेब्रुवारी 20, 2026 5:58 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरात अतिक्रमणधारकांवर मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून कारवाईचा बडगा उगारला असून शहरातील अनेक ठिकाणचे अतिक्रमण हटविले जात आहे. याच दरम्यान आज शुक्रवारी (२० फेब्रुवारी) मनपा अतिक्रमण निर्मूलन पथकाने जळगाव शहरात अत्याधुनिक नवीन जिल्हा न्यायालय उभारणीसाठी निश्चित करण्यात आलेल्या शाहू नगर येथील ट्राफिक गार्डन परिसरातील सुमारे सात एकर जागेवरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली. या दरम्यान, आठ गाड्या व इतर वस्तू जप्त करण्यात आले

ataikramn

जिल्हा न्यायालयाची सध्याची जागा अपुरी पडल्यामुळे प्रशासनाने नवीन इमारतीसाठी या परिसराची निवड केली होती. या जागेवर अनेक खाद्यपदार्थ विक्रेते, हातगाडी चालक आणि गॅरेज व्यवसायिकांनी अतिक्रमण करून व्यवसाय सुरू केला होता, ज्यामुळे न्यायालयाच्या कामकाजासाठी आवश्यक जागा अडथळ्यात आली होती.

Advertisements

संबंधित जागा जिल्हा न्यायालय प्रशासनाने आधीच अधिकृतपणे ताब्यात घेतली असून, येथे कोणतेही अतिक्रमण करू नये, अशा सूचना फलकाद्वारे दिल्या होत्या. तरीही काही हॉकर्स आणि व्यवसायिकांनी अतिक्रमण पुन्हा केले, त्यामुळे प्रशासनाने कठोर भूमिका घेतली.

Advertisements

शुक्रवारी मनपा अतिक्रमण निर्मूलन पथकाने अधीक्षक संजय ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करत सर्व अतिक्रमण हटवले. यावेळी काही अतिक्रमणधारकांनी विरोध केला, पण पोलीस बंदोबस्ताच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात आली.

जिल्हा न्यायालयासाठी आवश्यक जागा मोकळी करून प्रशासनाने भविष्यात येथे अत्याधुनिक सुविधा असलेली नवीन न्यायालयीन इमारत उभारण्याची तयारी केली आहे. या नव्या इमारतीमुळे जिल्ह्यातील न्यायव्यवस्थेच्या कामकाजाला गती मिळण्याची अपेक्षा आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now