जळगाव शहरमहाराष्ट्र

जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीचे लागले ‘वेध’ : सर्वच पक्ष लागले तयारीला

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । चिन्मय जगताप । जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीचे ‘वेध’ आता लागायला सुरुवात झाली आहे. यामुळे आता सर्व स्तरांवरून इच्छुकांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. येत्या वर्षभरात महानगरपालिकेची निवडणूक होईल असा तर्क बांधला जात आहे. तर जून महिन्यात महानगरपालिका बरखास्त होणार आहे. यामुळे लवकरच सर्व पक्षांना निवडणुकीला सामोरे जायचे आहे. अशावेळी याबाबत पक्षाची तयारी सुरू झाली आहे का? आणि पक्षाला येत्या काळात निवडणुकीबाबत काय वाटतं हे जाणून घ्यायचा प्रयत्न ‘जळगाव लाईव्ह’च्या माध्यमातून करण्यात आला.(jalgaon mnp election 2023)

जळगाव लाईव्हच्या वतीने जळगाव शहरातील सर्व प्रमुख पक्षांच्या महानगराध्यक्षांची चर्चा करण्यात आली. यामध्ये ठाकरे गटाचे महानगर प्रमुख शरद तायडे, भारतीय जनता पक्षाचे महानगर प्रमुख दीपक सूर्यवंशी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महानगर प्रमुख अशोक लाडवंजारी, शिवसेनेचे महानगर प्रमुख गणेश सोनवणे यांच्याशी चर्चा करण्यात आली.(all main political parties in jalgaon)

जळगाव लाईव्हशी बोलताना भारतीय जनता पक्षाचे महानगर प्रमुख दीपक सूर्यवंशी यांनी सांगितले की, भारतीय जनता पक्ष हा निवडणूक बघून करीत काम करत नसतो तर भारतीय जनता पक्षाचे काम हे कायम सुरू असतं. यामुळे भारतीय जनता पक्ष पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढवणार आहे. निवडणूक आज हो की उद्या होवो भारतीय जनता पक्ष तयार आहे.पक्षाची ताकद खुप मोठी आहे. शहराला विकास हवा आहे. यामुळे आम्हीच पुन्हा सत्तेवर येणार हे नक्की. (deepak suryavanshi president jalgaon bjp)

ठाकरे गटाचे महानगरप्रमुख शरद तायडे यांनी सांगितले की , शिवसेना पक्ष हा नेहमीच ठामपणे निवडणुकीसाठी उभा असतो. आमचा वारसा हा जनसेवेचा आहे. जळगाव शहरात गेल्या काही वर्षात खऱ्या अर्थाने विकास हा शिवसेनेनेच केला आहे. यामुळे निवडणूक कधीही लागू द्या निवडणुकीमध्ये आम्हाला यश हे मिळणारच आहे आणि महानगरपालिकेवर पुन्हा एकदा भगवा हा फडकवला जाणारच आहे.(sharad tayade president jalgaon thakre shivsena )

याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महानगरअध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये एकनाथराव खडसे यांच्यासारखे अनुभवी नेतृत्व आल्याने त्याचा फायदा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला होणारच आहे. याचबरोबर आमचे सर्व वरिष्ठ नेते, सर्व आमदार, माजी मंत्री हे देखील मोठ्या जोराने राष्ट्रवादी काँग्रेस मोठा करण्याच्या हालचाली करत असल्याने महानगरपालिकेमध्ये आम्हाला नक्कीच घवघवीत यश मिळेल याचा आम्हाला विश्वास आहे. मोठ्या प्रमाणावर लोक आमच्याशी संपर्क साधून आहेत.(ashok ladvanjari ncp)

अधिकृत शिवसेनेचे महानगराध्यक्ष गणेश सोनवणे यांनी जळगाव लाईव्हशी बोलताना सांगितले की, आमची निवडणुकीची तयारी झालेली आहे. प्रत्येक वॉर्डात आमचा एक उमेदवार उभा राहील इतकी आमची शक्ती संपूर्ण शहरात आहे. कोणी सोबत आलं तर त्याच्यासोबत नाहीतर स्वबळावर ही निवडणूक लढण्याची आमची पूर्ण तयारी आहे. यामुळे निवडणूक कधीही लागू द्या विजय आमचाच होणार आहे हे आम्हाला माहिती आहे.(ganesh sonavne president jalgaon shinde shivsena)

गेल्या काही महिन्यांपासून किंबहुना वर्षापासून जळगाव शहराची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे अशावेळी अशा वेळी जनता ऐन निवडणुकीत नक्की कोणाला कौल देते? हे पाहणं अगदी उत्सुकतेचे ठरणार आहे

Related Articles

Back to top button