खुशखबर ! 26 ऑक्टोबरपासून जळगाव-मुंबई विमानसेवा दररोज सुरू होणार, पाहा वेळापत्रक

ऑक्टोबर 23, 2025 12:38 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑक्टोबर २०२५ । जळगावकरांसाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे सध्या आठवड्यातून चार दिवस सुरू असलेली जळगाव-मुंबई विमानसेवा आता दररोज सुरू होणार आहे. 26 ऑक्टोबरपासून अलायन्स एअरची जळगाव-मुंबई विमानसेवा दररोज सुरू होणार आहे. यामुळे प्रवाशांना केवळ दीड तासांत मुंबई गाठता येणार आहे.

jalgaon airport jpg webp

खरंतर उड्डाण योजनेअंतर्गत जळगाव विमानतळावरून गोवा, पुणे, हैदराबाद, मुंबई आणि अहमदाबाद या शहरांसाठी विमानसेवा उपलब्ध आहे. यापैकी अलायन्स एअर कंपनीकडून मुंबईसाठी आठवड्यातून चार दिवस सेवा दिली जात होती. परंतु मुंबईकडे व्यापार, उद्योग, शिक्षण, मंत्रालयीन कामकाज आणि वैद्यकीय उपचारांसाठी मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ असते. प्रवाशांच्या या उत्तम प्रतिसादामुळे 26 ऑक्टोबरपासून अलायन्स एअरची जळगाव-मुंबई विमानसेवा दररोज सुरू होणार आहे.

सध्या 26 ऑक्टोबरपर्यंत मुंबईहून जळगावसाठी रविवार, सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी, तर जळगावहून मुंबईसाठी रविवार, सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी विमानसेवा सुरू आहे. 26 ऑक्टोबरनंतर मात्र ही सेवा दोन्ही बाजूने दररोज उपलब्ध असेल.

मुंबई-जळगाव विमान सेवा
उड्डाण वेळ: सायंकाळी 7:10 वाजता
आगमन वेळ: रात्री 8:25 वाजता

जळगाव-मुंबई विमान सेवा
उड्डाण वेळ: रात्री 8:50 वाजता
आगमन वेळ: रात्री 10:10 वाजता

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now