⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

Jalgaon MLA Fight In Guwahati : ओ भो, हाय तर तडी भी झगडी ऱ्हायनात..!

जळगाव लाईव्ह न्यूज । Jalgaon MLA Fight In Guwahati । शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासह जवळपास ५० आमदार गेल्या पाच दिवसापासून गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये जाऊन थांबले आहेत. पाच दिवस झाले तरी कोणताही तोडगा निघत नसून शिवसेना अधिक आक्रमक झाली आहे. नवीन सरकार स्थापनेचा कोणताही मुहूर्त निघत नसल्याने बंडखोरांमध्येच वादविवाद सुरु झाल्याची चर्चा आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील देखील दोन आमदारांमध्ये शनिवारी वाद होऊन हाणामारीपर्यंत प्रकरण पोहोचल्याची चर्चा आहे.

बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी केल्यावर हे सर्व शांत झाले असले तरी भविष्यात मंत्रिपद कुणाला मिळणार यावरून वाद झाल्याचे समजते.शिंदे गटाच्या बंडखोरीने शिवसेना हादरली असून बंड केलेल्या आमदारांवर कारवाई करण्यासाठी शिवसेनेकडून पावले उचलली जात. मात्र आता शिवसेनेत अंतर्गत वाद व्ह्यायला सुरुवात झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील २ आमदारांमध्ये चागलीच भांडण झाली असे म्हटले जात आहेत. हे भांडण मंत्रिपदामुळे असून अजून कोणतीही कारण याला नाही असे म्हटले जात आहे.

https://twitter.com/jayeshwani/status/1540778261017677825?

मंत्रिपदावरून आसामात राडा…कोण होणार मुंबईत परतल्यावर मंत्री…. या मुद्द्यावरून जळगाव जिल्ह्यातील दोन आमदार एकमेकांशी भिडले आहेत. पार हातापाई झाली आहे, सूत्रांची माहिती. अशी एक पोस्ट सध्या जळगाव जिल्ह्यात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्या पोस्टवरून जळगाव जिल्ह्यात मात्र खळबळ उडाली आहे. मात्र, हा वाद नेमका कोणत्या दोन बंडखोर आमदारांमध्ये वाद झाला आहे, याचा उल्लेख मात्र त्या पोस्टमध्ये केलेला नाही.

एकनाथ शिंदे यांच्याकडे आता शिवसेनेसह अपक्ष असे जवळपास ५० आमदार सध्या गुवाहाटीत आहेत. उद्या या सगळ्यांच्या सह्यांचे पत्र राज्यपालांकडे पाठवले जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर आता पुढील घडामोडी आणि चर्चा दिल्ली आणि गुवाहाटीत होण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी शुक्रवारी मध्यरात्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात दोन तास चर्चा झाल्याचे वृत्त समोर आले आहे. दोघांच्या चर्चेनंतर येत्या काही दिवसांत ते सत्तास्थापनेचा दावा देखील करु शकतात.

एकनाथ शिंदे गटाकडे सध्या काही पर्याय असून त्यांना गट दुसऱ्या पक्षात विलीन करावा लागणार आहे. असे असले तरी ते स्वतःच्या गटाचे सरकार भाजपच्या साहाय्याने स्थापन करू शकतात. सत्ता स्थापनेचा मुहूर्त पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील सांगितला जाणार असल्याने बंडखोरांच्या मनात लाडू फुटू लागले आहे.

एकनाथ शिंदे गटात जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह आ.चिमणराव पाटील, आ.किशोर पाटील, आ.लता सोनवणे, आ.चंद्रकांत पाटील हे देखील आहेत. जळगावातील शिवसेनेचे सर्वच आमदार एकनाथ शिंदे गटात आहेत. सत्ता येणार असे म्हटले जात असल्याने ‘उतावीळ नवरा आणि गुडघ्याला बाशिंग’ असे म्हणत अनेकांना मंत्रीपदाची स्वप्ने पडू लागली आहेत. जळगावातील ४ नेते मंत्रिपदासाठी इच्छुक असल्याचे समजते. जळगाव जिल्ह्यातील दोन आमदारांमध्ये मंत्रीपदावरून वादावादी झाल्याचे वृत्त कालपासून व्हायरल होत आहे. एकाने तर तसे ट्वीट देखील केले आहे. सध्या एकत्र असलेल्या आमदारांपैकी आ.लता सोनवणे सोडल्या तर इतरांनी कधी न कधी एकमेकांवर टीका केलेली आहे.

जळगावातील आमदारांची वादावादी सुरू असल्याने एकनाथ शिंदे यांनी दोघांची खरडपट्टी काढत मध्यस्थी केली. सध्या सोशल मीडियात या वादावादीची जोरदार चर्चा असून नेमके कुणाचं वाजले हे कळत नाही. अनेकांकडून याबाबत अंदाज बांधले जात आहे.