गुन्हेजळगाव जिल्हा

जळगाव दूध फेडरेशन : संचालक मंडळाकडून प्रशासकांना धमक्या, पोलिसांना दिले पत्र

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑगस्ट २०२२ । संचालक मंडळाकडून प्रशासकांना धमक्या देण्यात येत असल्याचे पत्र पोलिसांना देण्यात आले आहे. अरविंद देशमुख यांनी हे पत्र दिले आहे. जिल्हा दूध संघातील वाद आता चिघळला आहे. प्रशासक मंडळाने दूध संघावर ताबा घेतला असून संचालक मंडळ बरखास्त केले आहे. मात्र २ ऑगस्ट रोजी मंदाताई खडसे यांच्यासह त्यांच्या संचालक मंडळातील ११ संचालकांनी अनधिकृतरित्या जिल्हा दूध संघाच्या आवारात बेकायदेशीररित्या प्रवेश करुन दूधसंघाच्या मिटींग हॉलमध्ये बैठक घेतल्याचा आरोप प्रशासक मंडळाने केला.मात्र याबाबाद अरविंद देशमुख यांनी तक्रार करूनही कारवाई झाली नाही यामुळे संचालक मंडळाकडून प्रशासकांना संचालक मंडळाकडून आम्ही पुन्हा येऊन बैठक घेऊ अश्या धमक्या येत आहे. असे निवेदनात म्हटले आहे. धमक्या

या संदर्भात प्रशासक अरविंद देशमुख यांनी शहर पोलीस स्थानकात तक्रार देखील दाखल केली होती. यापुढे संचालक मंडळाने बेकायदेशीररित्या प्रवेश केल्यास कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होवून गुन्हा घडल्याची शक्यता अरविंद देशमुख यांनी तक्रारीव्दारे व्यक्त केली असून संबंधितांवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी असेही तक्रारीत म्हटले होते. या संदर्भात शहर पोलीसात तक्रार दाखल करून देखील आजवर गुन्हा दाखल न झाल्यामुळे अरविंद देशमुख यांनी शहर पोलीस स्थानकाचे निरिक्षक यांना निवेदन सादर केले आहे. यात संबंधीतांवर कारवाई करण्यासाठी विलंब का होत आहे ? अशी विचारणा करण्यात आली आहे. तसेच संचालक मंडळ पुन्हा एकदा बैठक घेण्याची तयारी करत असून यातून कायदा व सुव्यवस्थेची काही अडचण निर्माण झाल्यास पोलीस प्रशासन जबाबदार राहणार असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button