---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा

जळगाव एमआयडीसी पोलिसांकडून दोन दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस, दोघे ताब्यात

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरासह जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटना काही केल्या कमी होत नसून याच दरम्यान जळगाव एमआयडीसी पोलिसांनी शहरातील दोन दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणून दोन चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहे. तसेच चोरीस गेलेल्या मोटारसायकलीही जप्त करण्यात आले आहे. आकाश सुरेश शिंदे (वय १९, रा. साईनगर, कुंसुबा, जळगाव) आणि सुरज मुनेंद्र द्विवेदी (वय २२, रा जळगाव) असं अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.

crime 2 jpg webp webp

या घटनेत पहिला गुन्हा असा की, १ फेब्रुवारी २०२५ रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्यादी सिद्धार्थ दीपक शर्मा (वय २३, रा. बालाजी मंदिर जवळ, जळगाव) यांनी तक्रार दिली होती की, २९ जानेवारी २०२५ रोजी मध्यरात्री त्यांच्या २५,००० रुपये किमतीच्या बजाज पल्सर दुचाकीची चोरी झाली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणात गुप्त माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून आकाश शिंदे याला अटक केली. त्याच्याकडून चोरीस गेलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.

---Advertisement---

दुसरा गुन्हा असा की, २२ नोव्हेंबर २०२४ रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दुसरा दुचाकी चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. फिर्यादी सायरस महेश बोंडे (वय २८ रा. रामानंद नगर, जळगाव) यांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी शिरसोली रोडवरील रॉयल टर्फ परिसरातून ३५,००० रुपये किमतीची होंडा ड्रीम युगा मोटारसायकल चोरीला गेली होती.

याप्रकरणी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे काल १९ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास सुरज मुनेंद्र द्विवेदी याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून चोरीस गेलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित आणि पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---