जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जानेवारी २०२६ । जळगाव शहर महानगरपालिकेच्या ७५ पैकी ६३ जागांसाठी गुरुवारी शहरात ५३.५९ टक्के मतदान झाले. यानंतर आज १६ जानेवारीला सकाळी १० वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार असून MIDCमधील वखार महामंडळाच्या गोदामामध्ये मतमोजणीची संपूर्ण तयारी पूर्ण झालेली आहे.




