जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जून २०२३ । जळगाव लोकसभा निवडणूक प्रमुखपदी भाजपाचे बडे नेते डॉ राधेश्याम चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
भारतीय जनता पार्टीच्या जळगाव लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणुन डॉ राधेश्याम चौधरी यांची नियुक्ती झाली आहे. या बाबतची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. डॉ राधेश्याम चौधरी यांचा रावेर लोकसभा मतदारसंघात त्यांचा चांगला प्रभाव आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती महत्वाची मानली जात आहे. चौधरी यांच्या नियुक्ती बद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.
आगामी महानगरपालिका, नगर पालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद मध्ये जळगाव लोकसभा मतदार संघातुन जास्तीत जास्त जागा भाजपाच्या निवडुन देण्याची त्यांच्यावर जबाबदारी असणार आहेत.