जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळ शहरातील नसरवांजी फाईल भागात ऑटो रिक्षामध्ये अवैधपणे घरगुती गॅस भरण्याचे उद्योग चालतात. ही माहिती मिळताच जळगाव येथील एलसीबीच्या पथकाने छापेमारी केली. त्यात घरगुती गॅसचे तब्बल २७ सिलिंडरसह रिक्षा जप्त केली. १ लाख ५७ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेत दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

जळगावच्या एलसीबी पथकाने पाळत ठेवून शनिवारी छापा टाकला. त्यात शेख नौशाद हा एका ऑटोरिक्षामध्ये गॅस भरताना रंगेहाथ सापडला. या ठिकाणी पोलिसांनी रिक्षासह २७ गॅस सिलिंडर, वाहनात गॅस भरण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले. शेख नौशाद शेख नजीर आणि रिक्षा चालक नीलेश सुरेश चौधरी (रा.पंढरीनाथ नगर, भुसावळ) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल केला. ही कारवाई शरद बागल, कमलाकर बागुल, गोपाल गव्हाळे, संघपाल तायडे, सचिन पोळ यांच्या पथकाने केली आहे.