---Advertisement---
गुन्हे जळगाव शहर

जळगावात अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

crime (1)
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जुलै २०२१ । जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगरातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यातगुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

crime (1)

याबाबत असे की, शहरातील हरीविठ्ठल नगरात १७ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबियांसह राहाते. सोमवार १९ जुलै रोजी दुपारी १ ते २ वाजेच्या सुमारास १७ वर्षीय मुलगी घरात कुणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेली. दरम्यान संशयित आरोपी स्वप्निल शरद सोनवणे याने पळवून नेल्याचा संशय मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे.

---Advertisement---

याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी स्वप्निल सोनवणे याच्या विरोधात तक्रार देण्यात आली आहे. तक्रारीवरून रामानंद नगरपोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि राजेश शिंदे करीत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---