काय सांगताय! नशिराबादमार्गे जाणार जळगाव-जालना रेल्वेमार्ग?

जुलै 11, 2025 7:17 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जुने २०२५ । रेल्वे मंत्रालयाकडून जळगाव- जालना या नवीन रेल्वे लाइनला मंजुरी दिल्यानंतर रेल्वे मार्ग कोणत्या मार्गाने होणार, तसेच भूसंपादन प्रक्रिया सुरू असून, मार्गा बाबत विविध सर्वेक्षण देखील सुरू असल्याची माहिती समोर येत आहे, तर जळगाव-नशिराबाद, अजिंठा, सिल्लोड-जालना असा रेल्वे प्रशासनाकडून प्राथमिक स्वरूपात हा आराखडा तयार केला आहे.

train

जळगाव-जालना या १७४ किलोमीटरच्या नवीन रेल्वे लाइनला रेल्वे मंत्रालयाने १० ऑगस्ट २०२४ ला मंजुरी दिली. या रेल्वे लाइनसाठी जालना महसूल प्रशासनाकडून भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे. जळगाव जिल्ह्यातील भूसंपादन प्रक्रियेबाबत तांत्रिक अडचणी समोर येत असल्याने रेल्वेमार्ग निश्चत करण्यात रेल्वे प्रशासनापुढे अडचणी येत असल्याची माहिती समोर येत आहे, तसेच रेल्वे प्रशासनाने प्राथमिक स्वरूपात मार्गाचा आराखडा तयार केला आहे.

या रेल्वे लाइनसाठी जळगाव, जालना, तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ९३५ हेक्टर जमीन भूसंपादन करावी लागणार आहे. ७ हजार १०६ कोटी रुपयांचा खर्च या रेल्वे लाइनसाठी लागणार आहे.महसूल विभागाकडून असोदा, पिंपळे आदी गावालगतच्या जमिर्नीचे भूसंपादन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. जळगाव-जालना या नवीन रेल्वे लाइन १७४ किमी लांबीची असून, त्यात १९ स्टेशन, ३ नद्यांवर मोठे पूल, १३० छोटे पूल, ३ बोगदे प्रस्तावित आहेत. या रेल्वे मार्गाचा बांधकामाचा आराखडा भुसावळ रेल्वे विभागाकडून केला जात असून, भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रेल्वे मार्ग व बांधकामाचा आराखडा तयार केला जाणार आहे.

या मार्गावरील स्टेशन
जळगाव ते जालना या रेल्वे मार्गाच्या प्राथमिक आराखड्यामध्ये १९ रेल्वे स्टेशन आहेत. यात जळगाव, नशिराबाद, धानवड, नेरी, सुनसगाव बुद्रुक, पहूर, वाकोद, अजिंठा लेणी, अन्वी, सिल्लोड, भोकरदन, सोयगाव, केदारखेडा, राजूर, बावने पांगरी, पिंपळगाव, नागेवाडी, दिना गाव व जालना या स्टेशनचा समावेश असू शकतात.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment