जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जुलै २०२४ । जळगाव जिल्हा कारागृहामध्ये हत्याकांडप्रकरणात बंदी असलेल्या मोहसीन असगर खान (वय २५ रा. भुसावळ) याचा दुसऱ्या बंदीने हत्या केल्याची घटना घडलीय. याप्रकरणी संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणी प्रभारी तुरुंग महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी कारागृहातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. कारागृहात थेट कैद्यापर्यंत चाकू पोहोचलाच कसा? असा सवाल करत बॅरेकचा रक्षक गणेश पाटील याला तत्काळ निलंबित केले. तर अन्य अधिकाऱ्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती डॉ. सुपेकर यांनी दिले.
गेल्या दोन तीन दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर येथील पथक देखील चौकशीसाठी आले आहे. डॉ. सुपेकर यांनी संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे. कारागृहामध्ये बुधवार दि. १० जुलै रोजी सकाळी मोहसीन असगर खान याचा धारदार शास्त्राने कारागृहातील बॅरेक क्रमांक ४ येथे संशयित आरोपी शेखर मोघे यांनी धारदार शस्त्राने खून केला होता. (केसीएन) या प्रकरणी वरिष्ठ तुरुंग अधिकारी गजानन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.
तर शेखर मोघे याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान गुरुवारी दि. ११ जुलै रोजी प्रभारी तुरुंग महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी संध्याकाळी भेट दिली. यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, गुरुवारी कारागृहाची पाहणी केली. खून झाला ते घटनास्थळ पाहिले. सोबतचे बंदी व कारागृह अधिकारी, कर्मचारी यांची चौकशी केली. कारागृहाचे रेकॉर्ड तपासले.
त्यानंतर प्राथमिकदृष्ट्या निष्काळजीपणा आढळल्याने कारागृह रक्षक गणेश पाटील यांना निलंबित करण्यात आल्याचे डॉ. सुपेकर यांनी पत्रकारांना सांगितले. कारागृह अधीक्षक अनिल वांढेकर, वरिष्ठ तुरुंग अधिकारी गजानन पाटील, पीएसआय देवरे यांच्यासह सर्व कर्मचारी देखील यावेळी उपस्थित होते.