Gold Rate : ग्राहकांचं टन्शन वाढलं! जळगावच्या सुवर्णपेठेत सोन्याचा तोळा पुन्हा ८० हजारांवर

जानेवारी 18, 2025 11:55 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जानेवारी २०२५ । अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) सरकार पुन्हा सत्तेत येते असल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीच्या दरात तेजी आली आहे. जळगावच्या सुवर्णपेठेत सोने (Gold Rate) दराने ८० हजार रुपयांचा टप्पा पुन्हा पार केला आहे. यामुळे लग्नसराईसाठी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना घाम फुटला आहे. येत्या आठवड्यात सोन्याचे दर स्थिर राहण्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. Gold Silver Rate Today

GS18 January

गेल्या पंधरवड्यात सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे २ हजार रुपयांची वाढ झाली आहे. शुक्रवारी पुन्हा ७०० रुपयांनी सोने महाग होऊन ८०४०० रुपये (जीएसटीसह ८२८१२) प्रतितोळा झाले. दुसरीकडे चांदीचा दर विनाजीएसटी ९२००० हजार रुपये प्रति किलो इतकी आहे.

दरम्यान सोन्याचे प्रतितोळ्याचे दर ११ नोव्हेंबर रोजी ७७,७०० विना जीएसटी तर जीएसटीसह ८०,०३१ रुपयांवर गेले होते. त्या अगोदर ३१ ऑक्टोबर रोजी विना जीएसटी ८० हजारांवर तर जीएसटीसह ८२४०० वर गेले होते. त्याला मागे टाकून शुक्रवारी सोने विना जीएसटी ८०४०० व जीएसटीसह ८२८१२ वर पोहचले आहे.

सध्या सोन्याच्या दरात तेजीची स्थिती असली तरी येणाऱ्या आठवड्यात सोने दरात फारशी वाढ होणे अपेक्षित नाही. सोने दरात पाचशे ते हजार रुपये चढउतार होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now