जळगावमध्ये सोन्यासह चांदीने पुन्हा नवीन उच्चांक गाठला; ग्राहकांसह व्यावसायिकांमध्ये खळबळ

सप्टेंबर 16, 2025 5:52 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ सप्टेंबर २०२५ । मागच्या काही दिवसांपासून सोन्यासह चांदीचे दर नवनवीन रेकॉर्ड प्रस्तापित करीत असून त्यामुळे ग्राहकांचा उत्साह काहीसा मंदावला आहे. ग्राहक दर कमी होण्याची वाट पाहत असून मात्र दोन्ही धातूंचे दर वाढतच असल्याचं दिसतेय. जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत आज मंगळवारी बाजार उघडताच सोने चांदी दरात मोठी वाढ झाली. ज्यामुळे दोन्ही धातुंनी पुन्हा नवीन उच्चांक केल्याचे दिसून आले. ज्यामुळे ग्राहकांसह व्यावसायिकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली.

gold silver jpg webp

प्रत्यक्षात सोमवारी जळगावमध्ये दिवसभरात २०६ रूपयांनी घट झाल्याने २४ कॅरेट सोन्याचा दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख १३ हजार ६०९ रूपये नोंदविला गेला. परंतु, मंगळवारी सकाळी बाजार उघडताच सोन्यात ७२१ रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे १२ तारखेचा उच्चांक मोडीत काढून पुन्हा नवीन उच्चांक प्रस्थापित करणाऱ्या सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख १४ हजार ३३० रूपयांपर्यंत पोहोचले.

जळगावमध्ये सोमवारी चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो एक लाख ३३ हजार ९०० रूपयांपर्यंत होते. मंगळवारी सकाळी बाजार उघडताच १०३० रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे चांदीचे दर प्रति किलो एक लाख ३४ हजार ९३० रूपयांपर्यंत पोहोचले.

सोने दरवाढीचे कारण काय?

जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या किमतींमध्ये ऐतिहासिक वाढ नोंदवली जात आहे. बुधवारी अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या धोरणात्मक बैठकीत व्याज दरात कपात होण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे. व्यापाऱ्यांच्या मते, या निर्णयामुळे गुंतवणुकदारांचा ओढा सोन्याकडे अधिक वाढला आहे. फेड व्याज दरात कपात करत राहिल्यास वर्ष अखेरीस आणखी शिथिल आर्थिक धोरण लागू होण्याची शक्यता आहे. या संभाव्य बदलांचा थेट परिणाम जागतिक कमोडिटी बाजारावर झाला असून सोन्याच्या किमतींना जोरदार पाठबळ मिळाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now