Gold Rate : जळगावात सोने दरात बदल; स्वस्त झाले की महाग? तपासा आताचे भाव..

जानेवारी 19, 2025 11:51 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जानेवारी २०२५ । सोने आणि चांदी दराने पुन्हा एकदा जोरदार मुसंडी मारली आहे. जळगाव येथील सराफा बाजारात दोन्ही धातुनी ग्राहकांना घाम फोडला. ऐन लग्नसराईत दरवाढीने वधू-वर मंडळींना जादा रक्कम मोजावी लागत आहे. दरम्यान, शनिवारी सोने ५० रुपयांनी घसरले. Gold Silver Rate Today

gold silver jpg webp

जळगाव सोन्याच्या दरात आठवडाभरात २ हजार रुपयांची वाढ झालेली असल्याने बाजारात खरेदी मंदावली आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसापासून प्रती तोळ्यामागे ५० रुपयांनी घसरले आहे. अमेरिकेत डोनाल्ट ट्रम्प सरकार सत्तेत येत असल्याने आंतरराष्ट्रीय सोने बाजारात सोन्याच्या दरात तेजी आलेली असताना गुरुवार व शुक्रवार या दोन दिवसात सोने १०० रुपयांनी कमी झाले. गुरुवारी ७९७०० असलेले सोन्याचे दर शुक्रवारी घसरुन प्रति तोळ्याचे दर ७९६५० झाले. तर शनिवारी सोन्याचे प्रती तोळ्याचे दर ७९६०० रुपये झाले होते. दरम्यान, काही दिवस सोने-चांदीमधील दरातील चढ-उतार कायम राहणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now