अक्षय्य तृतीयेपूर्वी ग्राहकांना सुखद धक्का! जळगाव सराफ बाजारात सोने-चांदी स्वस्त..

एप्रिल 17, 2026 1:21 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ एप्रिल २०२६ । अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी आजचा दिवस दिलासादायक ठरला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून सातत्याने वाढणाऱ्या सोन्या-चांदीच्या किमतींना शुक्रवारी सकाळी बाजार उघडताच ब्रेक लागला असून दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात घसरण नोंदवण्यात आली आहे.सोन्याच्या दरात तब्बल १२३६ रुपयांची, तर चांदीच्या दरात १०३० रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी दोन्ही धातूंचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच आहेत. Gold Silver Rate Today

gold

काय आहे सोन्याचा दर

जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत शुक्रवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर १२३६ रुपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,५६,८६९ रुपयांपर्यंत खाली आले. यापूर्वी गेल्या दोन दिवसात सोने दरात १४४० रुपयाची वाढ झाली होती.

चांदीचा दर

सोन्यापाठोपाठ आज चांदी दरातही घसरण झालीय. आज शुक्रवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर १०३० रुपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो २,६०,५९० रुपयांपर्यंत खाली आले. यापूर्वी गेल्या दोन दिवसात ४,१२० रुपयाची वाढ झाली होती.

सध्या अमेरिका आणि इराण यांच्यातील संभाव्य शांतता कराराच्या चर्चेमुळे जागतिक बाजारपेठेत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. या आंतरराष्ट्रीय घडामोडींचा थेट परिणाम सोन्या-चांदीच्या किमतींवर झाला असून भारतीय बाजारपेठेतही दर खाली आले आहेत.

अक्षय्य तृतीया आणि लग्नसराईचा उत्साह

सध्या लग्नसराईचा हंगाम आणि अक्षय्य तृतीया अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने बाजारात दागिन्यांची मागणी प्रचंड वाढली आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जात असल्याने, आज झालेली ही दरातील घट ग्राहकांसाठी गुंतवणुकीची चांगली संधी मानली जात आहे. मात्र, दर जरी कमी झाले असले तरी ते अद्यापही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच असल्याचे चित्र बाजारपेठेत दिसून येत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now