जळगाव लाईव्ह न्यूज । २१ फेब्रुवारी २०२५ । एकीकडे लग्नराईचे दिवस सुरू असल्याने वर आणि वधूसाठी सोन्याचे (Gold Rate) दागिने खरेदी केले जातात. परंतु याचदरम्यान सोन्याच्या दराने मोठी उसळी घेतली. सोने चांदी रोज नवनवीन विक्रमी मुल्य गाठत आहे. जळगाव सुवर्णपेठेत गुरुवारी सोने दरात किंचित घसरण झाली तर चांदी (Silver Rate) दरात एक हजार रुपयाची घसरण झाली. यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. Gold Silver Rate Today

विशेष या आठवड्याच्या चारच दिवसांत सोने प्रति तोळ्यामागे १७०० रुपयांनी महाग झाले आहे. गेल्या शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजार बंद होताना ८६२०० रुपये तोळा असलेले सोने सोमवारी ५०० रुपयांनी घसरून ८५७०० वर स्थिरावले. तर मंगळवारी ४०० रुपयांनी वाढले त्यानंतर बुधवारी, शिवजयंतीला त्यात १ हजारांची वाढ होऊन ८७१०० रुपयांवर पोहोचले. तर गुरुवारी शंभर रुपयाची घसरण होऊन सोने ८७००० प्रति तोळ्यावर आले आहे.
गेल्या चार दिवसांत सोने तब्बल १७०० रुपयांनी महागले आहे. सोन्याप्रमाणे बुधवारी चांदीतही १ हजार रुपयांची वाढ झाली होती. त्यामुळे चांदीचे प्रति किलोचे दर ९९००० रुपये होते; परंतु गुरुवारी चांदी पुन्हा १ हजाराने घसरून ९८००० हजारांवर आली. सोने-चांदीच्या दरात आगामी काळातही असेच चढउतार होत राहील, त्यामुळे गुंतवणूकदारांनी बाजार भावाकडे लक्ष देऊन गुंतवणूक करावी. आगामी काळात तेजीचा अंदाज आहे.