जळगाव लाईव्ह न्यूज । १७ नोव्हेंबर २०२४ । सोने आणि चांदी दरात चढ-उताराचे सत्र कायम असून या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी जळगावच्या सुवर्णपेठत सोन्याच्या दरात वाढ दिसून आली. मात्र दुसरीकडे चांदी दरात मोठी घसरण झालेली दिसून आली. तुम्हीही आज सोने चांदीचे दागिने खरेदीला जाणार असाल तर आताचे दर तपासून घ्या..
या आठवड्याच्या पहिल्या दिवशी जळगावच्या सराफ बाजारात २४ कॅरेट सोन्याच्या भावात ३०० रुपयाची वाढ झाली. यामुळे आता सोन्याची किंमत विनाजीएसटी ७७,३०० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. तर चांदी दरात एक हजाराची घसरण झाली. आता चांदीचा एक किलोचा भाव विनाजीएसटी ९१,००० हजार रुपयावर पोहोचला आहे.
आगामी दोन दिवसात सोने महागणार?
जळगाव शुद्ध सोन्याच्या दरावर आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींचा परिणाम होतो. दोन देशातील युद्ध परिस्थिती तसेच आज १७ व उद्या १८ डिसेंबर रोजी अमेरिकन फेडरल बँकेची बैठक होणार आहे. यात व्याजदरात ०.२५ टक्के कपात करण्याचे धोरण बैंक जाहीर करण्याचा अंदाज आहे. त्याचा परिणाम म्हणून आगामी दोन दिवसात सोन्याच्या दरात किमान १५०० रुपयांची वाढ होण्याची शक्यता जानकरांनी वर्तविली आहे.