Gold Silver : जळगावच्या सुवर्णबाजारात सोने-चांदी दरात पुन्हा उसळी, आताचे दर तपासून घ्या..

जुलै 19, 2025 10:15 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जुलै २०२५ । सोने आणि चांदीच्या भावात चढ उतार सुरूच आहे. जळगावच्या सुवर्णबाजारात शुक्रवारी सोने दरात मोठी वाढ. सोबतच चांदी दरातही मोठी वाढ झाली आहे. यामुळे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आज जास्त पैसे मोजावे लागणार आहे.

GS19 July

शुक्रवारी जळगाव सराफ बाजारात सोने दरात प्रति तोळा ७०० रुपयाची वाढ झाली. यामुळे आज शनिवारी सकाळच्या सत्रात २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ९८,५०० (जीएसटीसह १०१४५५) रुपयावर पोहोचला आहे. २२ कॅरेट सोन्याच्या दरात ६४२ रुपयाची वाढ होऊन प्रति १० ग्रॅम ८९६५३ रुपये इतका आहे.

तर चांदीचा भाव देखील वाढला आहे. चांदी दरात १००० रुपयाची वाढ झाली. यामुळे आता एक किलो चांदीचा दर विनाजीएसटी ११३००० रुपयावर आहे.

सोने स्वस्त होऊ शकते का?

सध्या सोने दरात वाढ दिसत असून, येत्या काळात सोन्याच्या किमती कमी होऊ शकतात असे आर्थिक तज्ज्ञांचे मत आहे. एका अंदाजानुसार, सोन्याचा दर प्रति तोळा ९५ हजारापर्यंत येऊ शकते. तथापि, बाजारातील अस्थिरता पाहता, अस्थिरता कायम राहू शकते.

किंमती का बदलत आहेत?

सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये बदल होण्याची अनेक कारणे आहेत जसे की जागतिक आर्थिक परिस्थिती, डॉलरची हालचाल, व्याजदर, शेअर बाजाराची परिस्थिती आणि देशांतर्गत मागणीतील चढउतार. लग्न, पूजा आणि सावनमध्ये गुंतवणूकीमुळे सोन्याची मागणी वाढते, ज्यामुळे किमती वाढतात.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now