Gold Rate : सोन्याने गाठला नवीन विक्रमी उच्चांक, जळगावच्या सुवर्णपेठेतील आताचे दर पाहिलेत का?

जून 14, 2025 10:34 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जून २०२५ । गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत चढ उतार होताना दिसतोय. काल शुक्रवारी जळगावच्या सुवर्णपेठेत सोन्याच्या किमतीने नवीन विक्रमी उच्चांक गाठला आहे. १३ जून रोजी एकाच दिवसात सोने दरात दोन हजार ६०० रुपयांची वाढ झाली.त्यामुळे सोने ९९ हजार ८०० रुपये (जीएसटीसह १०२७९४) अशा नव्या उच्चांकी भावावर पोहचले आहे. चांदीत १०० रुपयांची घसरण होऊन ती एक लाख सहा हजार ५०० रुपयांवर आली आहे.

gold silver 1 jpg webp

१२ जून रोजी ७०० रुपयांच्या वाढीसह सोने ९७ हजार २०० रुपये प्रतितोळा पोहचले होते. १३ जून रोजी सकाळी त्यात थेट दोन हजार रुपयांची व संध्याकाळी पुन्हा ६०० रुपये वाढ झाली. यापूर्वी २२ एप्रिल रोजी सोने ९९ हजार रुपयांवर होते. त्यानंतर मात्र भाव कमी कमी होऊन ते अनेक दिवसांपासून ९६ ते ९७ हजारादरम्यान राहिले.

एक तोळ्यासाठी १,०२,७९४ रुपये
विनाजीएसटी सोन्याचा भाव एक लाख रुपयांच्या जवळ पोहचला आहे. सध्याच्या भावानुसार एक तोळे सोन्यासाठी जीएसटीसह एक लाख दोन हजार ७२४ रुपये मोजावे लागणार आहेत. चांदीच्या भावात थोड़ी-थोडी घसरण होत आहे. ११ जून रोजी एक लाख सात हजार २०० रुपयांवर स्थिर असलेल्या चांदीच्या भावात १२ जून रोजी ६०० रुपयांची घसरण होऊन ती एक लाख सहा हजार ६०० रुपयांवर आली. १३ जून रोजी पुन्हा १०० रुपयांची घसरण झाली व ती एक लाख सहा हजार ५०० रुपये प्रतिकिलोवर आली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment