⁠ 
शनिवार, ऑक्टोबर 26, 2024
Home | जळगाव जिल्हा | ग्राहकांसाठी आनंदवार्ता! दसऱ्यापूर्वीच सोन्यासह चांदीच्या किंमती घसरल्या, आताचे भाव तपासून घ्या..

ग्राहकांसाठी आनंदवार्ता! दसऱ्यापूर्वीच सोन्यासह चांदीच्या किंमती घसरल्या, आताचे भाव तपासून घ्या..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑक्टोबर २०२४ । नवरात्र उत्सवाला सुरुवात होताच सोन्यासह चांदीच्या किंमती वाढल्या. ऐन सणासुदीत सोने चांदीचे दर वाढीने ग्राहकांना मोठी झळ बसत आहे. दसरा सारखा सण आता अवघ्या तीन दिवसावर आहे. त्यापूर्वी ग्राहकांना किंचित दिलासा मिळाला.

जळगावच्या सुवर्णनगरीत सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किमतीत घसरण झाली. चांदी दरात देखील घसरण दिसून आली. गेल्या दोन दिवसात सोन्याच्या दरात प्रति तोळा ८०० रुपयापर्यंतची घसरण झाली. तर काल चांदी दरात १००० रुपयापर्यंतची घसरण झाली. त्यामुळे तुम्ही आजच सोनं खरेदी करून दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर घरी आणू शकता. त्यासाठी आजचा भाव नेमका किती ते जाणून घ्या.

काय आहेत भाव?
जळगाव सराफ बाजारात २२ कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी ६९,४८६ रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी ७५,८०० रुपये प्रति तोळा इतका आहे. दुसरीकडे चांदीचा दर विनाजीएसटी ९३,००० रुपये प्रति किलो इतका आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. तुळशी विवाहानंतर लग्नसराईचा हंगाम सुरू होणार आहे. ऐन लग्नाच्या हंगामात सोन्याची किंमत मागील सर्व रेकॉर्ड मोडित काढणार असल्याचे भाकित सराफ व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे पक्ष पंधरवाड्यापासून सोन्याने दरवाढ नोंदवली आहे. गेल्या पंधरा दिवसात सोन्यात ५००० रुपयांनी तर चांदीतही १० हजार रुपयांची वाढ झाली आहे. आगामी काही दिवसांत सोन्याच्या दरात वाढ होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.