जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑगस्ट २०२४ । या आठवड्याच्या पहिल्या दिवसापासून सोन्याच्या किमतीत घसरण दिसून येत आहे. सोबतच चांदी देखील घसरताना दिसत आहे. तुम्हीही सोने किंवा चांदी खरेदीचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. सोने-चांदीच्या किंमती आज पुन्हा एकदा घसरल्या आहेत. यामुळे सोन्याचा भाव ६९ हजाराच्या घरात आला आहे.
जळगावच्या सुवर्णपेठेत आज सोन्याच्या दरांमध्ये २०० रुपयांपर्यंत घसरण झाली आहे. यामुळे २४ कॅरेट सोन्याचा भाव आता ६९,८०० रुपयावर आला आहे. यापूर्वी काल सकाळच्या सत्रात सोन्याचा दर ७०००० हजारावर विकला जात होता. त्यात घसरण झाली. दुसरीकडे चांदीच्या आलेल्या किंमतीनुसार, आज १ किलो ग्राम चांदीचा भाव ८१,९०० रुपये इतका आहे.
सध्या सोन्याच्या किंमत सातत्याने घसरत असल्याने सामान्य नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच अनेक जणांनी दागिने खरेदी करत सोने-चांदीमधील गुंतवणूक आणखी वाढवली आहे. दरम्यान, ऑगस्ट महिन्यात तेजीचे संकेत असताना सोने-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सोन्यापेक्षा चांदी अधिक घसरली आहे. गेल्या १५ दिवसांत चांदी ९ हजारांनी स्वस्त होऊन ८२ हजार रुपये (जीएसटीसह ८४४६०) किलोपर्यंत खाली आहे. केंद्राच्या अर्थसंकल्पात सोन्या-चांदीवरील कस्टम ड्यूटी कमी केल्याने दोन्ही धातूंच्या किमतीत विक्रमी घसरण झाली आहे. यामुळे खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र आगामी सणासुदीच्या काळात सोने चांदीचे दर वाढतात कि कमी होतात? याकडे ग्राहकांचं लक्ष लागून आहे.