⁠ 
शुक्रवार, सप्टेंबर 20, 2024
Home | जळगाव जिल्हा | एकाच दिवसांत चांदी 4000 रुपयांनी स्वस्त, सोने 500 रुपयांनी घसरले ; जळगावामधील आताचे दर पहा..

एकाच दिवसांत चांदी 4000 रुपयांनी स्वस्त, सोने 500 रुपयांनी घसरले ; जळगावामधील आताचे दर पहा..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जुलै २०२४ । अर्थसंकल्पात आयात शुल्क 6 टक्क्यांपर्यंत कमी केल्यापासून सोन्या-चांदीच्या किमतीत सातत्याने घसरण होत आहे. सलग तिसऱ्या दिवशी सोन्या- चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली असून जळगाव सुवर्णपेठेत सोन्याचा भाव आता ११२ दिवसानंतर ७० हजाराखाली आला आहे. सोन्यापेक्षा चांदीत मोठी घसरण झाली. एकाच दिवसांत चांदी ४ हजार रुपयांनी घसरली आहे.

सोने-चांदीचे दर जूनमध्ये स्थिर असताना जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात वाढून सोने दर विनाजीएसटी ७४,५०० रुपये तोळा आणि चांदी विनाजीएसटी ९३००० हजार रुपये किलोवर पोहोचली होती. मात्र अर्थसंकल्पात कस्टम ड्यूटीत कपातीनंतर सातत्याने घसरण होत आहे.

बजेटमधील घोषणेनंतर लगेच मंगळवारी सोन्याचा भाव २८०० रुपयांनी घसरला होता. त्यांनतर बुधवारी सोन्याचा दर ७०० तर गुरुवारी त्यात ५०० रुपयाची घसरण झाली. गेल्या तीन दिवसात सोने तब्बल ४००० हजार रुपयांनी स्वस्त झाले आहे. यामुळे आज शुक्रवारी सकाळच्या सत्रात  २२ कॅरेट सोने विनाजीएसटी ६४,१७० रुपये प्रति १० ग्रॅम तर २४ कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी ६९,५०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे.

सोने सुमारे ४ महिन्यांपासून ७० हजारांच्या पुढे होते. ते ११२ दिवसांनी प्रथमच ७० हजारांपेक्षा खाली गेले आहे. ३ एप्रिल रोजी सोन्याचे प्रति तोळ्याचे दर ६९७०० होते त्यात वाढ होऊन ४ एप्रिल रोजी प्रथमच ७० हजारांवर पोहोचले होते. ते गुरुवारी पुन्हा सोने ६९५०० रुपये झाले आहे.

चांदीतही मोठी घसरण
दुसरीकडे मागील तीन दिवसात चांदी तब्बल ७००० हजारापर्यंत घसरली आहे. गुरुवारी एकच दिवसात त्यात ४००० रुपयाची घसरण दिसून आली. यामुळे आता चांदीचा दर विनाजीएसटी ८३,००० रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. गुरुवारी ९६ दिवसांनी पन्हा ८३ हजारांवर चांदी आली आहे. यापूर्वी चांदी ११ एप्रिल रोजी ८२ हजार रुपये तर १२ एप्रिलला २ हजाराने वाढून ८४ हजार रुपये किलोवर पोहोचली होती.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.