⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | ग्राहकांना पुन्हा झटका! जळगाव सुवर्णपेठेत सोन्याचे दर २२०० रुपयांनी वाढले

ग्राहकांना पुन्हा झटका! जळगाव सुवर्णपेठेत सोन्याचे दर २२०० रुपयांनी वाढले

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ नोव्हेंबर २०२४ । ऐन दिवाळीत उसळी घेतलेल्या सोने आणि चांदीच्या किमतीत गेल्या पंधरा दिवसात मोठी घसरण झाली होती. मात्र आता दोन्ही धातूंचे दर वाढताना दिसत आहे. रशिया-युक्रेन युध्दाचा भडका झाल्याने तीनच दिवसात सोन्याचे दर २२०० रुपयांनी वाढले आहे. दुसरीकडे चांदी दरात मोठी वाढ झालीय.

गुरुवारी जळगावच्या सराफा बाजारात शुद्ध सोने ७७,७०० रुपये तोळा (जीएसटीसह ८०,०३१) तर चांदी ९३००० रुपये किलोवर स्थिरावली. मागील पंधरवड्यात सोन्याच्या दरात अडीच हजारांची घसरण झाली होती. त्यानंतर ७५ हजारांपर्यंत खाली आले होते. तर सणासुदीच्या काळात ३० ऑक्टोबर रोजी ८०,४०० रुपये प्रती तोळ्याचा (विना जीएसटी) उच्चांक गाठलेल्या सोन्याचे भाव ट्रम्प इम्पॅक्टमुळे नोव्हेंबरमध्ये ७४८०० पर्यंत घसरले होते.

त्यानंतर भाव अस्थिर होते. सोने ७५ हजारांवर असताना सोमवारी ते ५०० रुपयांनी वाढले तर मंगळवारी पुन्हा ११०० रुपयांनी वाढून ७६५०० वर पोहचले. बुधवारचा अपवाद वगळता गुरुवारी पुन्हा १२०० रुपयांनी महाग झाले.

पुढील पंधरवड्यात चढउतार सुरु राहील रशिया-युक्रेनमध्ये पुन्हा युध्दाचा भडका उडाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारावर त्याचा परिणाम झाला. त्यामुळे सोन्याच्या दरात वाढ होत आहे. आगामी १५ दिवस दरात चढउतार होत राहील. तोळ्यामागे २ हजार रुपयांनी स्वस्त नाहीतर महाग होईल असा अंदाज आंतरराष्ट्रीय सोने बाजाराचे अभ्यासक आदित्य नवलखा यांनी व्यक्त केला आहे

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.