जळगाव लाईव्ह न्यूज । १८ फेब्रुवारी २०२६ । सोने आणि चांदीची दरात चढ-उतार सुरूच असून मागच्या दोन दिवसात दोन्ही धातूंच्या दरात मोठी घसरण झाल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र यांनतर आज बुधवारी सकाळच्या सत्रात सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा किरकोळ वाढ नोंदवली गेली. त्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सोन्याचा दर
जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत बुधवारी सकाळी बाजार उघडल्यावर २४ कॅरेट सोन्याच्या दरात ३०९ रुपयांची किरकोळ वाढ नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ५७ हजार ३८४ रुपयांपर्यंत पोहोचले. यापूर्वी सलग दोन दिवस सोने दरात घसरण झाली होती. सोमवारी १५४५ रुपयांची घट नोंदवली गेल्याने २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ५९ हजार १३५ रुपयांपर्यंत खाली आले होते. तर मंगळवारी दिवसभरात पुन्हा २०६० रुपयांची घट नोंदवली गेल्याने दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ५७ हजार ०७५ रुपयांपर्यंत घसरले होते. मात्र आज वाढ झाली.

चांदीचा दर
दुसरीकडे जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत बुधवारी सकाळी बाजार उघडल्यावर चांदी दरात २०६० रुपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ५१ हजार ३२० रुपयांपर्यंत पोहोचले. यापूर्वी चांदीत सोमवारी (दि १६) ७२१० रुपयांची तर काल मंगळवारी ६१८० रुपयांची घट झाली होती. यामुळे चांदीचा दर जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ४९ हजार २६० रुपयांपर्यंत घसरले होते.











