⁠ 
रविवार, ऑक्टोबर 6, 2024
Home | जळगाव जिल्हा | Jalgaon Gold Silver : सोने-चांदी दरात पुन्हा मोठी उसळी ; ग्राहक हैराण, पहा आताचे भाव?

Jalgaon Gold Silver : सोने-चांदी दरात पुन्हा मोठी उसळी ; ग्राहक हैराण, पहा आताचे भाव?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ सप्टेंबर २०२४ । ऐन सणासुदीच्या तोंडावर सोने आणि चांदीच्या किमतीने पुन्हा मोठी मजल मारली असून यामुळे खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. गेल्या आठवड्यापासून सोने आणि चांदीच्या दरवाढीने ग्राहक हैराण झाले आहेत.

या आठवड्याच्या सुरुवातीलाच दोन्ही धातूंमध्ये दरवाढी झाली. जळगावच्या प्रसिद्ध असलेल्या सुवर्णपेठेत सोमवारी सोने दरात ३०० तर चांदी दरात ९०० रुपयाची वाढ झाली यामुळे यामुळे आता २४ कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी ७४,४०० रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. तर चांदीचा एक किलोचा दर ८९ हजार ५०० रुपयावर जाऊन पोहोचला आहे.

गेल्या आठवड्याभरात चांदी दरात तब्बल ७००० हजार रुपयापर्यंतची वाढ झाली आहे. दुसरीकडे सोने दरात प्रति तोळा २२०० रुपयापर्यंतची वाढ झाली. सणासुदीत बेशकिंमती धातूंच्या या तुफान खेळीने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

सोन्याची शुद्धता कशी ओळखावी?
सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले आहे. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. कॅरेट 24 पेक्षा जास्त नाही आणि कॅरेट जितके जास्त असेल तितके सोने शुद्ध असेल.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.