---Advertisement---
जळगाव जिल्हा वाणिज्य

लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सोने-चांदी दरात मोठा बदल; खरेदीला जाण्यापूर्वी तपासून घ्या आताचे भाव..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑक्टोबर २०२४ । ऐन दिवाळीमध्ये सोने आणि चांदी दरात वाढ होतं असल्याचं दिसून आले. यामुळे जळगावात सोन्याच्या दरांनी आजवरचे सगळे विक्रम मोडले आहेत. दरम्यान दिवाळीच्या पहिल्या दिवशी दोन्ही धातूंमध्ये घसरण दिसून आले. मात्र तरी देखील सोने चांदीचे दर सर्वमान्यांच्या आवाक्याबाहेरच आहे.

GS1 Nov

दिवाळीच्या काळात सोने ८० हजारांचा गाठणार असल्याचा अंदाज यापूर्वीच तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. त्यानुसार, लक्ष्मी पूजनाला सोन्याने अपेक्षेप्रमाणे दमदार कामगिरी केली.दिवाळीच्या पहिल्या दिवशी सकाळच्या सत्रात सोन्याचा दर विनाजीएसटी ८०,४०० रुपयावर पोहोचला होता. तर चांदीचा एक किलोचा भाव १ लाख रुपयावर पोहोचला होता.

---Advertisement---

मात्र जळगाव सराफ बाजारात गुरुवारी सायंकाळपर्यंत सोने दरात ४०० रुपयाची तर चांदी दरात १ हजार रुपयाची घसरण झाली आहे. यामुळे आता २४ कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी ८०,००० रुपये प्रति प्रति तोळा तर जीएसटीसह ८२,४०० रुपये प्रति तोळा इतका आहे. तसेच चांदीचा एक किलोचा दर विनाजीएसटी ९९,००० रुपये इतका आहे.

दरम्यान, दिवाळीनिमित्त जळगावची सुवर्णनगरी ग्राहकांनी गजबजल्याचं पाहायला मिळालं. सध्या सोनं-चांदी दराने उसळी घेतलेली असली तरी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली आहे. सोने चांदीचे कॉईन, लक्ष्मीच्या मूर्ती खरेदीसाठी जळगावच्या सराफ बाजारात ग्राहकांची झुंबड पाहायला मिळाली.गेल्या वर्षापेक्षा यंदा सोन्याच्या दरात 20 हजार रूपयाची दरवाढ झाली असली तरी ग्राहकांची सोने खरेदीसाठी गर्दी आहे. तर चांदीच्या दरात वर्षभरात 20 हजार रुपयांची वाढ झाल्याची माहिती सराफ व्यावसायिक यांनी दिली आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---