---Advertisement---
जळगाव जिल्हा हवामान

शेतकऱ्यांचं टेन्शन वाढणार..! जळगावसह ‘या’ जिल्ह्यांना पावसासह तुफान गारपीटीचा इशारा

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मार्च २०२३ । पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे उत्तर बिहारपासून छत्तीसगड, विदर्भ, तेलंगणा ते कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे महाराष्ट्रात पावसाला पोषक हवामान तयार झाले. मागच्या काही दिवसांत खराब हवामानामुळे शेतकरी संकटात सापडत चालला आहे. त्यातच शेतकऱ्यांचं आणखी टेन्शन वाढवणारी बातमी आहे.

rain jpg webp

ती म्हणजे राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसासह तुफान गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने राज्यात आजपासून म्हणजेच १५ ते १८ मार्च दरम्यान, गारपीटीसह अवकाळी पाऊस होईल, असा अंदाज वर्तविला आहे. जळगाव जिल्ह्यातही अवकाळी पावसासह गारपिटीचा होणार असल्याचा अदांज वर्तविण्यात आला आहे.

---Advertisement---

 एकीकडे रब्बी हंगामाची पिके काढणीस सुरु असून त्यातच आता राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसासह तुफान गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे. आजपासून म्हणजेच १५ ते १८ मार्च दरम्यान, गारपीटीसह अवकाळी पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

या जिल्ह्यांना पावसासह गारपिटीची शक्यता :
या जिल्ह्यांना उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यासह नाशिक जिल्ह्यातील काही ठिकाणी गारपिटीसह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. औरंगाबाद, अहमदनगर आणि जालन्यातही काही ठिकाणी गारपिट होण्याची शक्यता आहे.

या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
मध्य महाराष्ट्र आयएमडीने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या दिवशी कोकणासह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. १७ मार्च रोजी जळगाव, अहमदनगर,पुणे, औरंगाबाद जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी, वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.

तर १८ मार्च रोजी अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम आणि यवतमाळमध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात देखील हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---