जळगावकरांना बसणार ‘ऑक्टोबर हिट’ चा तडाखा! आगामी पाच दिवस असं राहणार तापमान?

ऑक्टोबर 18, 2025 12:18 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑक्टोबर २०२५ । मागच्या काही दिवसापूर्वी जळगाव शहरासह जिल्ह्यात किमान तापमानात घसरण झाल्याने रात्री आणि पहाटे गुलाबी थंडी जाणवत होती. मात्र पावसाच्या शक्यतेमुळे आणि ढगाळ वातावरणामुळे मागच्या दोन तीन दिवसात वातावरणात पुन्हा बदल होऊन किमान तापमान २० अंशांपर्यंत गेलं. यामुळे आर्द्रतेमुळे उकाडा जाणवत असून ‘ऑक्टोबर हिट’चा अनुभव जळगावकरांना येत आहे. आगामी पाच दिवस किमान तापमान २० ते २४ अंशापर्यंत राहण्याची शक्यता आहे.

tapman 2

गेल्या काही दिवसापूर्वी जळगावाचे किमान तापमान १६ अंशापर्यंत घसरले होते. यामुळे रात्री आणि पहाटे गुलाबी थंडी जाणवत होती. यातच दोन दिवसापूर्वी हवामान खात्यानं जळगाव शहरासह जिल्ह्यात परतीच्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मात्र पावसाने उसंती दिल्याने आणि ढगाळ वातावरण तयार झाल्यामुळे मात्र किमान तापमान वाढताना दिसून आले. यामुळे रात्रीची आणि पहाटची थंडी पुन्हा गायब झाली आहे.

जळगावात आता १८ ते २२ ऑक्टोबर या कालावधीत कमाल तापमान ३५ डिग्री सेल्सियसपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. ज्यामुळे भासमान तापमान ३९ डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचू शकते. तर किमान तापमान २० ते २४ डिग्री सेल्सियसवर राहिल. यादरम्यान, आर्द्रता ५० ते ७० टक्क्यांपर्यंत कायम राहणार असल्यामुळे उकाडा वाढेल. दिवाळीनंतर म्हणजेच ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात तापमानात अजून वाढ होण्याचे संकेत मिळत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now