जळगाव जिल्हा एसटीला भारत जोडोमुळे मिळाले तब्बल ७५ लाख, पण… प्रवाशांचे हाल
जळगाव लाईव्ह न्यूज| १८ नोव्हेंबर २०२२ | काँग्रेस नेते राहुल गांधी यांची शेगाव येथे भव्य सभा आयोजित करण्यात आले आहे. यासाठी जळगाव जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते शेगाव येथे दाखल झाले आहेत. जळगाव जिल्ह्यातून तब्बल ३१६ बसेस या शेगावला रवाना झाल्या आहेत. पर्यायी जळगाव जिल्हा बस आगाराला एका दिवसात तब्बल 75 लाख रुपयाचा फायदा झाला आहे. मात्र इतर ठिकाणी जाणाऱ्या नागरिकांचे आगाराने घेतलेल्या या भूमिकेमुळे मोठे हाल झाले आहेत.
जळगाव जिल्हा आगारात एकूण 723 बसेस आहेत. या बसेस पैकी एकूण 316 बसेस या फक्त शेगावला रवाना झाल्या आहेत. यामुळे इतर ठिकाणी जाणाऱ्या नागरिकांचे चांगलेच हाल झाल्याचे पाहायला मिळत आहे. लांब पल्ल्याच्या गाड्या जसे की मुंबई, पुणे, औजारंगाबाद, ठाणे, कल्याण, नाशिक याचबरोबर इतर राज्यात जाणाऱ्या गाड्या या भारत जोडो यात्रेमुळे रद्द करण्यात आल्या आहेत. पर्यायी नागरिकांचे मोठे हाल होत असल्याचे दिसून येत आहे.
अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे, जळगाव जिल्हा बस आगाराला यामुळे 75 लाख रुपयाचे उत्पन्न अधिक मिळाले आहे. मात्र शाळांसाठी व विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या बसेस रद्द केल्या नसल्याचे यावेळी प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे. याचबरोबर जिल्हा अंतर्गत असलेल्या बसेस देखील बंद नसल्याचेही आगारातर्फे सांगण्यात आले आहे. मात्र लांब पल्ल्याच्या बसेस बंद असल्यामुळे नागरिकांचे चांगलेच हाल झाल्याचे निदर्शनास आले